27 February 2021

News Flash

दोन दिवसांत खातेवाटप करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

"तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही."

संग्रहीत

राज्यात सरकार स्थापनेच्या सर्व प्रक्रिया आणि आवश्यक नियुक्त्या पार पडल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “बहुमत चाचणी, अध्यक्षांची निवडीची प्रक्रिया पार पडली, या सर्वातून आम्ही आता मोकळे झालो आहोत, त्यामुळे यापुढील काम वेगाने करु. खातेवाटपही एक दोन दिवसांत करु, तुर्तात आम्ही सातही मंत्री सगळी खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. त्यामुळे राज्याला पुढे जाण्यासाठी कुठेही अडथळा निर्माण होत नाही. म्हणून अद्याप खातेवाटप झालेले नाही मग आता काय होणार अशी काळजी करण्याचे कारण नाही.”

महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीवेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, छगन भुजबळ, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नीतीन राऊत या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सातही मंत्री सध्या सरकारचा कारभार चालवत आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मोठ्या राजकीय नाट्यानंतर महिनाभराने शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 9:09 am

Web Title: portfolio will be announced in two days says cm uddhav thackeray aau 85
Next Stories
1 मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा घोळ कायम
2 मंदीच्या सावटातही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून मागणी
3 मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली
Just Now!
X