08 March 2021

News Flash

माटुंग्यात इमारतीचा भाग कोसळून दोघांचा मृत्यू

माटुंगा पूर्व येथे असलेले माटुंगा मेन्शन (नवे नाव देढिया हाऊस) या इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला.

माटुंगा पूर्व येथील भांडारकर मार्गावरील माटुंगा मेन्शन या इमारतीचा पुढचा भाग मंगळवारी रात्री कोसळून इमारतीच्या आडोशाला झोपलेल्या दोघांचा मृत्यू झाला.

माटुंगा पूर्व येथे असलेले माटुंगा मेन्शन (नवे नाव देढिया हाऊस) या इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री कोसळला. इमारतीसमोर रोज कचरावेचक आणि इतर मजूर झोपत असत. रात्री झालेल्या या अपघातात कचरावेचक आणि दुसरा मजूर दबला. इमारतीचा भाग पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत दोन्ही व्यक्तींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले. शीव रुग्णालयात दोघांना दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोघांचीही अजून ओळख पटलेली नाही. जुनी असलेली इमारत धोकादायक होती की कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा भाग कोसळला याचा तपास माटुंगा पोलीस करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 2:35 am

Web Title: portion of building collapses in matunga area of south mumbai 2 killed
Next Stories
1 होय, मी नरेंद्र मोदींचा चमचा !
2 गाळातल्या बेस्टची मेट्रोकडून खिल्ली
3 आज उच्च न्यायालयात सुनावणी
Just Now!
X