22 February 2020

News Flash

दोन लाख पणत्यांद्वारे साकारली श्रीरामाची प्रतिमा; कलाकाराने रचला जागतिक विक्रम

विशेष म्हणजे हा कलाकार एक मराठी व्यक्ती असून मुंबईतल्या पवई येथे त्यांनी आपली कला सादर केली आहे. सोशल मीडियावरही त्याच्या कलेचे भरभरुन कौतूक होत आहे.

मुंबई : चेतन राऊत या हरहुन्नरी कलाकाराने २ लाख विविधरंगी पणत्यांच्या सहाय्याने श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे.

विविध प्रकारे मोकळ्या जमिनीवर भली मोठी प्रतिमा साकारण्याची किमया अनेक कलाकारांनी साधली आहे. अशीच श्रीरामाची प्रतिमा एका कलाकाराने २ लाख पणत्यांच्या मदतीने ५,४०० चौरसफूट इतक्या प्रंचड जागेवर साकारली आहे. याद्वारे या कलाकाराने जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे हा कलाकार एक मराठी व्यक्ती असून मुंबईतल्या पवई येथे त्यांनी आपली कला सादर केली आहे. सोशल मीडियावरही त्याच्या कलेचे भरभरुन कौतूक होत आहे.

चेतन राऊत असे या हरहुन्नरी कलाकाराचे नाव असून त्याने २ लाख विविधरंगी पणत्यांच्या सहाय्याने श्रीरामाच्या प्रसिद्ध छायाचित्राची प्रतिमा साकारली आहे. यामध्ये रामाबरोबरच सीता, लक्ष्मण आणि हनुमानाचाही समावेश आहे. पवईतील कनाकिया फ्युचर सीटीच्या मोकळ्या जागेत राऊत यांनी ही भव्य प्रतिमा साकारली आहे. ९० फूट बाय ६० फूट म्हणजेच ५४,००० चौरस फूट जागेत ही कलाकृती साकारण्यात आली आहे.

या प्रतिमेचे फोटो आणि व्हिडिओ के सुदर्शन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहेत. त्यानंतर हे फोटोज इतर अनेक युजर्सनीही शेअर केले. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देताना ही अप्रतिम कलाकृती असल्याचे म्हटले आहे.

या महापुरुषांच्याही साकारल्या प्रतिमा

ही कलाकृती साकरणारे चेतन राऊत हे सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे माजी विद्यार्थी आहेत. नेहमीपेक्षा वेगळ्या वस्तूंचा वापर करीत भल्या मोठ्या प्रतिमा साकारल्याने राऊत यांची यापूर्वीच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद केली आहे. नुकतेच त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती दवंगत एपीजे अब्दुल कलाम यांची भव्य प्रतिमा किबोर्डच्या बटनांद्वारे साकारली होती. त्याचबरोबर खराब झालेल्या सीडीजच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाही त्यांनी साकारली आहे.

First Published on February 11, 2020 3:27 pm

Web Title: portrait of lord ram made with 2 lakh divas sets a new world record aau 85
Next Stories
1 22 वर्षांनंतरही ‘ती’ लहान मुलीसारखी दिसायची, केली आत्महत्या
2 Video: झोपलेल्या मगरीच्या जबड्यातून मांस चोरण्याचा बिबट्याने प्रयत्न केला अन्…
3 त्यांच्या गळ्यातील यंत्र कोणते?, नेटकऱ्यांमध्ये चर्चा; थरुर यांनीच दिलं उत्तर, म्हणाले…