News Flash

सनदी लेखापाल परीक्षा रद्द होण्याची शक्यता

१० जुलैला अंतिम निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) जुलै-ऑगस्ट महिन्यात नियोजित असलेली सनदी लेखापाल परीक्षा रद्द होण्याची शक्यता असून याबाबत संस्था १० जुलैला अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

सनदी लेखापाल परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार होती. मात्र करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा २९ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे नियोजन संस्थेने केले. परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती विद्यार्थी आणि पालकांनी संस्थेला केली होती. त्यावर संस्थेने जुलैमधील परीक्षा किंवा नोव्हेंबरमधील परीक्षेला बसण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला. मात्र त्याला पालकांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

अनेक राज्यांत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात असे पालकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली असून सद्य:स्थितीत परीक्षा घेणे कठीण असल्याचे मान्य करून सर्व राज्यांशी बोलून परीक्षांबाबत अंतिम निर्णय १० जुलैला न्यायालयात सादर केला जाईल, असे संस्थेने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:37 am

Web Title: possibility of cancellation of chartered accountant examination abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे निधन
2 ‘आरोग्योत्सवा’च्या भूमिकेचे स्वागत, पण..
3 रेल्वे डब्यांचे अतिदक्षता कक्षात रूपांतर करणे अव्यवहार्य
Just Now!
X