ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांच्या वाढत्या तक्रारी पाहता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम जाहीर करण्याच्या हालचाली शालेय शिक्षण विभागात सुरू झाल्या आहेत. तसा प्रस्ताव विभागाने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यास पूर्व प्राथमिक आणि पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यावर बंदी येऊ शकते. तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना दिवसातून एक तास, पाचवी-सहावीच्या विद्यार्थ्यांना दोन तास, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना तीन तास ऑनलाइन शिक्षण देण्याचे बंधन घातले जाऊ शकते. याबाबत अधिकृत नियमावली लवकरच जाहीर केली जाईल.