मुंबई : मुंबई महापालिके तील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले. सर्वोच्च न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब के ले आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपचा दावा फे टाळून लावला असून भाजपला मोठा फटका बसला आहे. मात्र भाजपने याप्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई महापालिकेत २०१७ च्या पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यानंतर सर्वाधिक नगसेवक निवडून आल्याने शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरला. भाजपलाही शिवसेनेच्या जवळपास जागा मिळाल्या. मात्र तरीही भाजपने विरोधी पक्षावर दावा न करता पालिके त पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन के ल्यानंतर भाजपने पालिके तील विरोधी पक्षनेतेपदावर दावा के ला होता. तसेच नगरसेवक विनोद मिश्रा यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून जाहीरही के ले होते. महापौरांनी पालिका सभागृहात हा दावा फे टाळल्यानंतर भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयात भाजपचा दावा फे टाळण्यात आल्याची माहिती विद्यमान विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयानेही दावा फे टाळल्यामुळे भाजपने आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 12:26 am