सत्ताबदल होताच जुन्या सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे हे नवीन नाही. पण करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर कठोर उपाय योजण्यात येत असताना मध्य प्रदेशात सत्ताबदल होताच भाजप नेत्यांशी वाद झालेल्या दोन सनदी अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

जुन्या सरकारच्या काळातील सत्ताधाऱ्यांचे निकटवर्तीय किं वा जवळच्या मानल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. बदल्या करण्याचा संपूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. नव्या सत्ताधाऱ्यांना जुन्या सरकारच्या काळातील अधिकारी नकोसे असतात. यामुळे वरिष्ठ पातळीवर होणाऱ्या बदल्या यात नवीन काहीच नाही. पण मध्य प्रदेशात सत्ताबदल होताच अवघ्या २४ तासांत महिला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली.

वास्तविक करोनाशी सामना करताना जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भूमिका महत्वाची असते. तरीही राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि रेवा महानगरपालिके चे आयुक्त संभजित यादव यांच्या बदल्या के ल्या. दोन्ही अधिकाऱ्यांचा भाजपच्या स्थानिक नेत्यांशी वाद झाला होता आणि त्यांच्या तडकाफडकी बदल्यांना हेच कारण कारणीभूत ठरले.

राजगढच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आणि उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांची भाजपच्या स्थानिक नेत्यांशी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोच्र्याच्या वेळी झटापट झाली होती. तेव्हा वर्मा यांनी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या कानाखालीच आवाज काढला होता. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यानेही मारहाण के ल्याचा आरोप के ला होता. या घटनेबद्दल शिवराजसिंग चौहान यांची नाराजी व्यक्त करीत कारवाईची तेव्हा मागणी के ली होती. सत्तेत येताच चौहान यांनी माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या राजगढच्या जिल्हाधिकाऱ्याची बदली के ली.

भाजप नेत्याशी वाद.. रेवा महानगरपालिका आयुक्त यादव आणि माजी मंत्री राजेंद्र शुक्ला यांच्यात वाद सुरू होता. यादव यांनी भाजरपच्या माजी मंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात पाच कोटींचा बदनामीचा दावा गुदरला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताबदल होताच आयुक्तांनाही बदलण्यात आले. दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून टीका होऊ लागताच अन्य काही अधिकाऱ्यांच्या भाजप सरकारने बदल्या केल्या.