News Flash

राज्यात पुन्हा वीजपुरवठय़ाचा उच्चांक

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांच्या तीव्रतेबरोबरच वीजमागणीचा आलेखही उंचावत असून ‘महावितरण’ने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७०.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवत पुन्हा एकदा वीजपुरवठय़ाचा उच्चांक गाठला.

| October 16, 2014 02:19 am

राज्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांच्या तीव्रतेबरोबरच वीजमागणीचा आलेखही उंचावत असून ‘महावितरण’ने १४ ऑक्टोबर रोजी तब्बल ३७०.९८ दशलक्ष युनिट वीज पुरवत पुन्हा एकदा वीजपुरवठय़ाचा उच्चांक गाठला.
उन्हाच्या तडाख्यामुळे पंखे, वातानुकूलन यंत्रणेचा वापर चांगलाच वाढला असून पाच ऑक्टोबर रोजी ‘महावितरण’ने ३६४.५७ दशलक्ष युनिट वीज राज्याला पुरवली होती. तर २९ सप्टेंबर २०१४ रोजी ३६२ दशलक्ष युनिट वीज पुरवठा झाला होता. त्यानंतर आता दहा दिवसांच्या आत पुन्हा एकदा वीजमागणीचा आणि पुरवठय़ाचा उच्चांक नोंदवला गेला.
मंगळवारी राज्यात विजेची मागणी १७ हजार ५७३ मेगावॉट होती. तर ‘महावितरण’ने १७ हजार २०० मेगावॉटचा पुरवठा केला. ३०० मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. एक ऑक्टोबरपासूनच राज्यात सतत १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:19 am

Web Title: power supply raises in maharashtra
टॅग : Power,Power Supply
Next Stories
1 विमानतळाच्या जमिनीपोटी एक हजार कोटींची भरपाई!
2 नामवंतांच्या हस्ते नवदुर्गाचा सन्मान
3 गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर ‘लोकसत्ता सुवर्ण लाभ’
Just Now!
X