07 July 2020

News Flash

खासगी डॉक्टरांना राज्य सरकारकडून पीपीई कीट

 करोना प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे आदेश

संग्रहित छायाचित्र

 

कोविड १९ व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू करणे आवश्यक  आहे. त्यासाठी या डॉक्टरांना सरकारतर्फे व्यक्तिगत सुरक्षा साधणे (पीपीई किट) द्यावीत असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.

वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

करोना प्रादुर्भावाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता, महापालिका आयुक्त उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 12:22 am

Web Title: ppe kit from state government to private doctors abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 पंतप्रधान मोदींचा जनतेशी पत्रसंवाद
2 करोनाच्या धास्तीने प्रवाशांची एसटीकडे पाठ
3 मृतदेह दहनाच्या रांगेत!
Just Now!
X