15 July 2020

News Flash

पीपीई घोटाळा : हिमाचल भाजप अध्यक्षांचा राजीनामा

गेल्या जानेवारी महिन्यात बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती.

संग्रहित छायाचित्र

पीपीई किट्स खरेदी घोटाळ्यात आरोप झाल्याने हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष राजीव बिंदल यांनी पदाचा राजीनामा दिला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या गृहराज्यातील प्रदेशाध्यक्षला घोटाळ्यामुळे हटवावे लागले आहे.

करोनाशी सामना करण्याकरिता हिमाचल प्रदेश सरकारने पीपीई किट्सची खरेदी केली. या खरेदीत राज्याचे आरोग्य संचालक ए. के . गुप्ता यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. ही ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्यावर गुप्ता यांना अटक करण्यात आली. ४३ सेकंदांच्या ध्वनिफितीत प्रदेश भाजप अध्यक्षांचा कुठेही उल्लेख नव्हता. तरीही घोटाळ्याचा सारा रोख हा बिंदल यांच्यावर होता. काँग्रेसने भाजपला लक्ष्य केल्याने अखेर पक्षाने बिंदल यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. पक्षाच्या आदेशानुसार नैतिकतेच्या मुद्यावर बिंदल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. गेल्या जानेवारी महिन्यात बिंदल यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती.

बिंदल यांच्यावर यापूर्वीही घोटाळ्याचे आरोप झाले होते. २०१२ मध्ये आरोग्यमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा जमीन घोटाळ्यात त्यांच्यावर आरोप झाले होते. नगरपालिके चे नगराध्यक्ष असतानाही त्यांच्यावर नोकर भरतीत गैरव्यवहारांचे आरोप झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:33 am

Web Title: ppe scam himachal bjp president resigns abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दक्षिण भारतात पालीच्या तीन नव्या प्रजातींचा शोध
2 रेल्वे कर्मचाऱ्यांकडूनच आंदोलन
3 एसटीचा राज्यांतर्गत प्रवास नाहीच
Just Now!
X