News Flash

कोकण विभागीय आयुक्तपदी प्रभाकर देशमुख

काही अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीची विनंती केली होती.

कोकण विभागीय आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची तर नागपूर सुधार प्रन्यासच्या (एनआयटी) अध्यक्षपदी दीपक म्हैसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कृषी आयुक्त विकास देशमुख यांच्यासह १६ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सामान्य प्रशासन सचिव प्रमोद नलावडे, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्मल देशमुख यांच्यासह पाच अधिकारी आज  सेवेतून निवृत्त झाले. त्याचप्रमाणे पंधरा दिवसांपूर्वी ज्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, त्यातील काही अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी बदलीची विनंती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:26 am

Web Title: prabhakar deshmukh selected as konkan divisional commissioner
Next Stories
1 अन्न व नागरी पुरवठामंत्र्यांच्या बदल्यांच्या अधिकारांना कात्री
2 राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये अधांतरी!
3 वृद्धाने नातवाला सहाव्या मजल्यावरून फेकले
Just Now!
X