19 September 2020

News Flash

प्रफुल्ल पटेल २५० कोटी तर पीयूष गोयल ९४ कोटींचे धनी !

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण नऊ कोटींची मालमत्ता आहे.

प्रफुल्ल पटेल, पीयूष गोयल

भाजपच्या तिजोरीची जबाबदारी सांभाळलेल्या केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर १०० कोटींची मालमत्ता असून, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल हे सुमारे २५० कोटींच्या मालमत्तेचे धनी आहेत. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये रावते अधिक ‘श्रीमंत’ आहेत.
पीयूष गोयल यांनी स्वत:, पत्नी आणि दोन मुलांची एकूण जंगम (गुंतवणूक, सोने-चांदी व बँक खात्यातील रक्कम) मालमत्ता ७८ कोटींची दाखविली आहे. गोयल यांनी १६ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याची माहिती दिली आहे. म्हणजेच स्थावर व जंगम अशी एकूण ९४ कोटींची गोयल यांची मालमत्ता आहे. पीयूष गोयल यांनी स्वत:च्या नावावर २५ कोटी, २५लाखांची मालमत्ता दाखविली आहे. पत्नी सीमा (५० कोटी, ५७लाख), मुलगा (१ कोटी ३९ लाख) तर मुलीच्या नावे एक कोटी, २२ लाखांची मालमत्ता आहे. पीयूष गोयल यांच्या नावावर दोन कोटी तर पत्नीच्या नावावर पावणे दोन कोटींचे सोने-चांदी व हिऱ्यांचे दागिने आहेत. गोयल यांनी सहा कोटींची गुंतवणूक केल्याचे दाखविले आहे. स्वत: गोयल यांच्या नावावर बँकेत ५१ लाख कर पत्नीच्या नावे २६ लाख बँकेत जमा आहेत. रोख्यांमध्ये साडेतीन कोटी रुपये गुंतविले आहेत. शरद पवार किंवा अन्य नेत्यांच्या नावांवर गाडय़ा नसल्या तरी गोयल यांच्या नावे ५० लाखांच्या दोन गाडय़ा आहेत. गोयल यांच्या नावावर सव्वा तीन कोटींची व पत्नीच्या नावे १३ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

रावतेंकडे नऊ कोटींची मालमत्ता
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे एकूण नऊ कोटींची मालमत्ता आहे. स्वत: रावते यांनी ७३ लाख, ८९ हजार तर पत्नीच्या नावे १ कोटी, ४७ लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. रावते यांच्याकडे २६ लाख तर त्यांच्या पत्नीच्या नावावर २२ लाख रुपयांचे सोने व चांदी आहे. रावते यांच्या नावे १ कोटी ६४ लाख रुपये तर पत्नीच्या नावावर साडेपाच कोटींची स्थावर मालमत्ता दाखविण्यात आली आहे. रावते यांच्या नावावर वर्सोवा येथे तर पत्नीच्या नावावर दादर येथे सदनिका असून, अलिबागजवळील नागाव येथे घर आहे.

देसाई आठ कोटींचे धनी
शिवसेनेचे नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वत: व कुटुंबियांच्या नावावर आठ कोटींची मालमत्ता असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. देसाई यांच्या नावावर स्थावर सव्वा पाच कोटी तर जंगम ४३ लाखांची मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे स्थावर आणि जंगम अशी दोन्ही प्रत्येकी १ कोटी १४ लाख अशी दोन कोटी २८ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

संजय राऊत यांच्याकडे १४ कोटींची मालमत्ता
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे स्थावर चार कोटी, ८१ लाख तर जंगम १ कोटी, ७५ लाख रुपयांची मालमत्ता आहे. राऊत यांच्या नावे एकूण साडेसहा कोटी तर पत्नीच्या नावावर साडेसात कोटींची मालमत्ता आहे.

* राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची स्थावर मालमत्ता १७१ कोटींची तर जंगम मालमत्ता ८१ कोटींची आहे. आतापर्यंत उमेदवार अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रफुल्लभाई सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 2:41 am

Web Title: praful patel piyush goyal
Next Stories
1 भुजबळांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल न्यायालयात सादर
2 प्रफुल्ल पटेल यांच्या शिष्टाईनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे जमले?
3 ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ला मुंबई विद्यापीठाकडून संशोधन केंद्राचा दर्जा
Just Now!
X