05 July 2020

News Flash

बौद्ध विवाह कायद्याला आंबेडकरांचा विरोध

राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते

| May 16, 2015 04:08 am

राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार आणि भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
१९५६ नंतर ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्यांना हिंदु विवाह कायदाच लागू आहे. परिणामी बौद्ध संस्कार पद्धतीने झालेले काही विवाह न्यायालयात अवैध ठरले आहेत. त्यामुळे बौद्धांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करावा, अशी मागणी बौद्ध समाजातील काही नेते व संघटनांनी केली आहे. त्यानुसार शासकीय स्तरावर त्याबाबत हालचाली सुरु आहेत. अलीकडेच या संदर्भात सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके यांनी संबंधित विभागाची बैठक घेतली होती. त्यात बौद्ध विवाह कायद्याच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली.
देशात विशेष विवाह कायदाही आहे. त्या अंतर्गत सर्वच धर्मातील लोकांना विवाह नोंदणी करता येते. त्यामुळे बौद्धांसाठी स्वतंत्र कायद्याची गरज नाही, असे आंबेडकर म्हणाले. किंबहुना रविवारी मुंबईत होणाऱ्या बौद्ध महासभेच्या अधिवेशनात या प्रस्तावाला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती  त्यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2015 4:08 am

Web Title: prakash ambedkar opposed buddhist marriage law
टॅग Prakash Ambedkar
Next Stories
1 १५ कोटी मोबाइलधारकांकडून ‘पोर्टेबिलिटी’ योजनेचा लाभ
2 मालमत्ता करात वाढ?
3 दूध विक्रेत्यांच्या ‘कमिशन’चा भार ग्राहकांवर
Just Now!
X