News Flash

महाराष्ट्राच्या हक्काच पाणी गुजरातला का देता ? – प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्राच्या वाटयाच हक्काच तापी नदीचं ३५ टीएमसी पाणी गुजरातला दिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत म्हणून ते पाणी गुजरातला दिलं जातं.

महाराष्ट्राच्या वाटयाच हक्काच तापी नदीचं ३५ टीएमसी पाणी गुजरातला दिलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत म्हणून ते पाणी गुजरातला दिलं जातं. ते पाणी गुजरातला का देता ? आपली खुर्ची राहिली पाहिजे म्हणून देता अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा-शिवसेनेवर प्रहार केला. शिवसेनेने त्यावरुन कधी आवाजा उठवला आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला.

महाराष्ट्रात दुष्काळ आहे. तापीच तेच पाणी वापरल तर महाराष्ट्रातला पाण्याचा प्रश्न सुटू शकतो असे ते म्हणाले. ७० वर्षात निवेदनांना केराची टोपली दाखवली. त्यामुळे यापुढे निवेदन द्यायला जाणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. शिवसेना-भाजपाचे नेते बिल्डर आहेत. त्यामुळे जिथे मिळेल तिथे जमीन गिळंकृत करतात. मग इकडचा स्थानिक माणूस उद्धवस्त झाला तरी चालेल.

कोळीवाडे, भंडाऱ्यांच्या जागांवर सहा बिल्डरांनी डोळे ठेवले आहेत. निवडणूक संपली की, जेसीबी लागल्याशिवाय राहणार नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुंबईत जमीन संपली आहे. आता गावठाणाच्या जमिनी आहेत. सातबारा नसल्यामुळे तुम्ही जमिनीचे मालक नाहीत असे सांगितले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार १८८० च्या कायद्याप्रमाणे कोळी, आग्री या गावठाणाच्या जमिनीचे मालक आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कुठल्याही पक्षाच्या बिल्डर असलेल्या उमेदवाराला मतदान करु नका असे आवाहन त्यांनी केले. वंचित बहुजन आघाडीबरोबर आलात तर तुमचे कोळीवाडे, भंडारीवाडे वाचवू असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 9:59 pm

Web Title: prakash ambedkar slams bjp shivsena
Next Stories
1 पाकिस्तानातल्या राजकारण्यांनी हिंदुस्थानातल्या मुस्लिमांची चिंता करु नये – असदुद्दीन ओवेसी
2 एअर इंडियाला विमान अपहरणाची धमकी, विमानतळावर हाय अलर्ट
3 मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही, मराठा समाजाचा निर्धार
Just Now!
X