21 September 2018

News Flash

आंबेडकरांची ‘मोदी हटाव’, तर आठवलेंची ‘भाजप बचाव’ मोहीम

रिपब्लिकन नेते गुजरात निवडणुकीच्या मैदानात

रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर

रिपब्लिकन नेते गुजरात निवडणुकीच्या मैदानात

HOT DEALS
  • Sony Xperia L2 32 GB (Gold)
    ₹ 14845 MRP ₹ 20990 -29%
    ₹1485 Cashback
  • Coolpad Cool C1 C103 64 GB (Gold)
    ₹ 11290 MRP ₹ 15999 -29%
    ₹1129 Cashback

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रिपब्लिकन नेतेही उतरले असून, विविध समाजघटकांतील बुद्धीजीवींची आणि तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी तयार करुन मोदी हटाव, संविधान बचाव, हे घोषवाक्य घेऊन भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या विरोधात मोहीम उघडली आहे. तर, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यंमत्री रामदास आठवले भाजपच्या बाजूने प्रचारात उतरणार आहेत.

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात वातावरण आहे, मात्र काँग्रेसची निवडणूक रणनीती पाहता, त्या पक्षाला त्याचा फायदा होईल का याबाबत साशंकता असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.

गुजरातच्या बारा जिल्ह्य़ांचा दौरा करुन आल्यानंतर मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना, भाजपला या वेळी निवडणूक सोपी जाणार नाही, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. नोटाबंदी, जीएसटी, यांबरोबरच राज्य सरकारची अकार्यक्षमता, धरणे, उद्योग, रोजगार या लोकांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, दलितांवरील अत्याचार, मुस्लिम समाजातील असुरक्षितता, असे अनेक घटक मोदी व भाजपच्या विरोधात एकत्र आल्याचे आपले निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण मागणारा पाटीदार समाज पूर्णपणे भाजपच्या विरोधात गेला आहे. त्यांची जय सरदार ही आधीची घोषणा होती, आता त्यांची जय सरदार, जयभीम अशी घोषणा झाली आहे. कोळी समाज जयभीम म्हणत भाजपविरोधात असल्याचे सांगत आहे. मुस्लिम समाज पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने जात आहे. भाजपच्या विरोधात जमनानस तयार होत असले तरी, काँग्रेसला त्याचा फायदा घेता येईल का, याबाबत शंका आहे. गेल्या दोन महिन्यात आपण सौराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील बारा जिल्ह्य़ांचा दौरा केला. पुढच्या टप्प्यात मध्य गुजरातचा दौरा करणार आहे. आपल्या पक्षाचा एकही उमेदवार आपण उभा केला नाही. काँग्रेसचा प्रचार करत नाही. मोदी हटाव संविधान बचाव, ही भूमिका घेऊन दलित, आदिवासी, मुस्लिम, पाटीदार, या समाजात प्रचार केला जात आहे, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले येत्या २२ नोव्हेंबरपासून गुजरातमध्ये भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यांचा पक्ष निवडणूक लढवित नाही. मतांचे विभाजन होऊन त्याचा काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आपला पक्ष निवडणूक लढवित नाही, असे आठवले यांचे म्हणणे आहे. भाजपला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.

First Published on November 15, 2017 1:29 am

Web Title: prakash ambedkar vs ramdas athawale in gujarat legislative assembly election 2017