भारतीय पदार्थाची जगभर वाहवा केली जात असली तरी अस्सल भारतीय पदार्थाचं ब्रँडिंग झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण त्याचा विशिष्ट दर्जा आणि वेगळेपण जपून ते ग्राहकांसमोर सादर केले जात नाहीत. दक्षिणेकडील पदार्थ आता याबाबत बऱ्यापैकी स्थिरावले असले तरी उत्तरेकडील पदार्थानी म्हणावा तितका लौकिक प्राप्त केलेला नाही. उत्तर भारतीय पदार्थाना तो लौकिक प्राप्त करून देण्यासाठी आणि ग्राहकांना नवनवीन पदार्थाद्वारे सरप्राइज करण्याचा विडा दोन तरुणींनी उचलला आहे. फूड आणि सरप्राइज यांचं मिश्रण असलेला ‘फुप्राईज’ या नावाने त्यांनी सुरू केलेला अनोखा प्रयोग नक्कीच वाखाणण्याजोगा म्हणावा लागेल.

nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
neeraj chpra
ऑलिम्पिक ध्वजवाहकाच्या नियुक्तीवरून वाद कायम! शरथ कमलऐवजी नीरज चोप्राकडे जबाबदारी देण्याकडे वाढता कल
Sangli
सांगली : तक्रार मागे घेण्यासाठी हॉस्पिटलकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मूळच्या दिल्लीच्या असलेल्या, पण गेली काही र्वष मुंबईत वास्तव्यास असलेल्या वैशाली भारद्वाज आणि राधिका शर्मा या दोन तरुणीनं ‘फुप्रा’ ईजची सुरुवात केली आहे. माध्यमातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून हॉटेल व्यवसायात उतरताना घरच्यांचा नेहमीप्रमाणे विरोध झालाच, पण अवघ्या साडेचार महिन्यांमध्ये ‘फुप्राईज’ने कमावलेला लोकांचा विश्वास पाहता आता घरच्यांचाही विरोध मावळला आहे. पराठा, पकोडा, समोसा आणि काही प्येय ‘फुप्राईज’ची खासियत आहे.पराठय़ासाठी तुमच्या आवडीचं पीठ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.

येथे पराठय़ासाठी तुमच्या आवडीचं पीठ निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, गहू, राजगिरा यापैकी कोणतंही पीठ तुम्ही पराठय़ासाठी निवडू शकता. एवढंच नव्हे तर एका पराठय़ामध्ये दोन प्रकारची पिठंही निवडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. कारण नेहमीचे पराठे सोडता एकाहून अधिक पदार्थाची कॉम्बिनेशन्स असलेला प्रत्येक पराठा हा डबल लेअर असतो. त्यामुळे तो खाताना पिठाळ न लागता त्याच्या आतमध्ये भरलेल्या सरप्राइजचा पुरेपूर आस्वाद घेता येतो. त्यानंतर त्या पिठामध्ये काय जाणार यासाठी तब्बल वीस ते बावीस पर्याय देण्यात आले आहेत. बटाटा, फ्लॉवर, कांदा, मुळा, मिक्स व्हेज या नेहमीच्या प्रकारांसोबतच पनीर, पनीर चीझ, पनीर कॉर्न, चीज कॉर्न, स्पिनच कॉर्न चीज, चीज ब्लॅकपेपर, चीज ओनिअन, चीज जलपिनो, मटर सोयाबीन, पपई, कच्ची पपई, ओरीओ, नटेला, अप्पल सिनेमन, केळं, अननस आणि सुका मेवा यातून तुम्हाला फ्लेवरची निवड करायची आहे. प्रत्येक पराठा हा वेगळ्या डीपसोबत सव्‍‌र्ह केला जातो. उदा. अ‍ॅपल सिनेमन पराठासोबत मध, ओरीओ आणि नटेला पराठासोबत चॉकलेट सिरप, चीजच्या सर्व फ्लेवर्ससोबत सालसा सॉस डीप म्हणून दिलं जातं आणि बेसिक फ्लेवर्ससोबत चटणी आणि लोणचं असतं. या पराठय़ांची किंमत पन्नास रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत आहे.

पकोडा म्हणजेच भजीमध्येही बटाटा, फ्लॉवर, कांदा, मिरची, पनीर, चीझ, मिक्स व्हेज, ब्रेड, चीज ब्रेड, मिरची चीज, ओरीओ, टोमॅटो इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत; पण त्यांची बनवण्याची पद्धत, दिसणं आणि चव स्टॉलवर मिळणाऱ्या भजीपेक्षा वेगळी आहे. सरप्राइज हवं असेल तर एकाच प्रकारची भजी मागवण्यापेक्षा ‘फुप्राईज’ पकोडा नावाचं सर्व भज्यांचा समावेश असलेलं एक भजी प्लॅटरही मिळतं ते आवर्जून खा.

उत्तर भारतीयांना समोसाविषयी जरा जास्तच प्रेम असतं. म्हणूनच मेन्यूमध्ये त्यासाठी विशेष कॅटेगरी आहे ज्यात जवळपास दहा प्रकारचे समोसे आहेत. बटाटा, मिक्स व्हेज. पनीर, छोले समोसा, चीज कॉर्न, मटर सोयाबीन, ड्रायफ्रूट सोयाबीन, स्पिनच कॉर्न चीज, चीज जलपिनो इ. प्रत्येक डिशमध्ये चार समोसे सव्‍‌र्ह केले जातात आणि पराठय़ांप्रमाणेच त्यांचे डीपही बदलतात. ड्रायफ्रूट चॉकलेट समोसा हा आवर्जून खाण्यासारखा आहे. चॉकलेट डीपसोबत सव्‍‌र्ह केला जाणारा हा समोसा बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट लागतो. चाटमध्येही क्लासिक आलू, चना चाट, दही भल्ला, पापडी, आलू तिखी हे प्रकार विशिष्ट चटण्यांसोबत सव्‍‌र्ह केले जातात.

पनीर ब्रेड पॉकेट्स, व्हेजिटेबल चीला, मूग डाळ चीला, मूग डाळ पनीर चीला, सब्जी रोटी सँडविच, छोले भटुरा, छोले राइस हे पौष्टिक आणि रुचकर प्रकार मुंबईत सहसा मिळत नाहीत. ते खायचे असतील तर ‘फुप्राईज’ गाठायला हरकत नाही. पुलाव-पराठा, पराठा कॉम्बो, चहा-पराठा-पकोडा कॉम्बो, पराठा टोकरी अशी काही कॉम्बिनेशन्सही त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. खाण्यासोबतच पिण्यासाठीही चहा, कॉफी, कोल्ड कॉफी, चॉकलेट लस्सी, छास, पॅशन फ्रूट आइस टी, पीच आइस टी असे पर्याय आहेत. या पेयांची चव इतर ठिकाणांपेक्षा नक्कीच वेगळी आहे.

‘फुप्राईज’चं किचन हे ओपन आहे. त्यामुळे तुम्ही ऑर्डर केलेला पदार्थ कसा तयार होतोय हे पाहण्याचीदेखील मुभा आहे. सर्व पदार्थासाठी घरगुती मसाले वापरले जातात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची विशिष्ट चव आहे. चटण्या किंवा सॉस तयार करतानाही प्रयोगातून वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला गेलाय. बसण्यासाठी टेबल आणि बैठी अशा दोन्ही व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या असून ऑर्डर येईपर्यंत मोफत वायफायचा वापर करू शकता. पार्सलची सुविधाही उपलब्ध आहेच. एकूणच उत्तर भारतीय पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या नवीन जागेला एक भेट द्यायला हरकत नाही. त्यांचे पदार्थ आणि चव तुम्हाला नक्कीच सरप्राइज करतील यात शंका नाही.

फुप्राईज

  • कुठे – शॉप क्रमांक ९, निओ कॉर्पोरेट प्लाझा, काचपाडा, रामचंद्र लेन एक्स्टेंशन, मालाड (पश्चिम), मुंबई</li>
  • कधी – सोमवार ते रविवार सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत.

nanawareprashant@gmail.com

@nprashant