म्हाडाच्या एकूण १०६३ घरांची आज लॉटरी काढण्यात आली. त्यामध्ये टाईमपास फेम ‘दगडू’ म्हणजे प्रथमेश परब, तसेच अभिनेत्री विशाखा सुभेदार घराचा जॅकपॉट लागला आहे. एकूण घरांपैकी ९९७ सदनिकांची सर्वसाधारण लॉटरी आणि अपंगांसाठी ६६ सदनिकांची विशेष लॉटरी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढण्यात आली.
म्हाडाच्या या घरांसाठी तब्बल १ लाख २५ हजार ८४४ अर्ज आले होते.  सकाळी १० वाजल्यापासून या लॉटरी सोडतीला सुरुवात झाली. या घरांसाठी अनेक मध्यम कलाकारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी प्रथमेश परब आणि विशाखा सुभेदार यांना म्हाडात घर मिळाले आहे. त्यामुळे आता मुंबईत प्रथमेशचे हक्काचे घर उभे राहिल्याने तो आनंदीत आहे.

विशाखा सुभेदार यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, मी सध्या अंबरनाथला राहायला आहे. गेली कित्येक वर्षे माझ्या डोक्यात म्हाडाच्या ऑनलाइन लॉटरीसाठी आपलं नशीब आजमवण्याची इच्छा होती. पण काही ना काही कामामुळे ते राहून जात होतं. पण, यावेळी पहिल्यांदा मी म्हाडाच्या घरासाठी नोंदणी केली आणि मला मुलुंडमध्ये घर मिळालं आहे. मुंबईत घर असण्याचा आनंदच काही  वेगळा असतो. 

Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
thane police issued tadipaar notice to sharad pawar faction ncp ex corporator mahesh
ठाणे: शरद पवार गटाच्या माजी नगरसेवकावर तडीपारीची टांगती तलवार
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara district, Hingnole village, karad, forest department reunited leopard cubs, mother
बिबट्याच्या पिल्लांनाही आवडला उसाचा मळा, शेवटी मादी बिबट त्यांना येऊन घेऊन गेली

मला घर लागलंय याचा मला खूप आनंद झाला आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं मुंबईत घर असाव. माझ हे स्वप्न म्हाडामुळे पूर्ण झालं. माझी इच्छा होती की, मला सायनला घर मिळावं आणि तिथे कलाकारांसाठी केवळ एकच जागा असल्यामुळे ते थोडं कठीण होत.  पण, मला प्रतिक्षानगरमध्ये  (सायन) घर मिळालं. माझ्या आईबाबांच्या कष्टामुळेचं हे होऊ शकले आहे. – प्रथमेश परब