News Flash

प्रतीक ठाकरे आणि शुभम कथले ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्रतीक आणि शुभम यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली.

प्रतीक ठाकरे

कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. परंतु प्रश्न असा की किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही? आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही; म्हणून हे जीव अकारण गेले.. तिसऱ्या जगाच्या इतिहासात देवाधर्माच्या यात्रांत जितक्यांनी प्राण गमावले तितके बळी आतापर्यंतच्या युद्धांतही गेले नसतील, असे मत मांडलेला ‘तीर्थी धोंडा पाणी..’ या अग्रलेखावर आपली भूमिका मांडत अमरावती जिल्ह्य़ातील धामणगाव रेल्वे तालुका येथील सेठ फत्तेलाल लबचंदजी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतीक ठाकरे हा ‘ब्लॉग बेंचर्स’च्या पहिल्या पारितोषिकाचा मानकरी ठरला आहे.

या स्पर्धेत पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम कथले याने दुसरे पारितोषिक पटकावले.

अग्रलेखावर मत मांडणाऱ्या प्रतीक आणि शुभम यांनी दर्जेदार लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. प्रतीकला सात हजार आणि प्रमाणपत्र तर शुभमला पाच हजार  रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांना चालना देत उत्तम लेखन केले.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थी भरभरून प्रतिसाद देत आहेत. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते.

विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात.

‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.loksatta.com/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:13 am

Web Title: pratik thakre and shubham kathle winners of loksatta blog benchers
Next Stories
1 प्राप्तिकर अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
2 महिला सरकारी वकिलाला लाचप्रकरणी अटक
3 ‘होय, शीना बोराचा मृतदेह इंद्राणी मुखर्जीनेच जाळला’
Just Now!
X