20 October 2020

News Flash

आत्महत्येपूर्वी प्रत्युषाकडून गर्भपात..

अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणातील गूढ मंगळवारी आणखीनच गडद झाले.

प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केल्याचे वैद्यकीय निष्कर्षांत निष्पन्न झाले आहे.

जेजेच्या वैद्यकीय अहवालातील निष्कर्ष
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्या प्रकरणातील गूढ मंगळवारी आणखीनच गडद झाले. प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केल्याचे वैद्यकीय निष्कर्षांत निष्पन्न झाले आहे. प्रत्युषाचा प्रियकर राहुलराज सिंग याने प्रत्युषाच्या बाळाचे पालकत्व नाकारल्याने तिने आत्महत्या केली का, या दिशेने पोलिसांना आता तपास करावा लागणार आहे.
‘बालिका वधू’फेम प्रत्युषा बॅनर्जी हिने १ एप्रिल रोजी तिच्या गोरेगाव येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी प्रत्युषाचा प्रियकर राहुल याच्याविरोधात बांगुरनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रत्युषाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर प्रत्युषाच्या पेशींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले होते. या अहवालात प्रत्युषाने अलीकडच्या काळात गर्भपात केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी प्रत्युषाने गर्भपात करून घेतला की अपघाताने तिचा गर्भपात झाला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या गर्भाचे पालकत्व कोणाचे होते, हे तपासणे पोलिसांना आव्हानात्मक ठरणार आहे.
दरम्यान, प्रत्युषा आणि राहुल यांच्यातील वादाचा मुद्दा प्रत्युषाची गर्भधारणा हा होता का, प्रत्युषाच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचे पालकत्व राहुलने नाकारले होते का, त्यातूनच आलेल्या नैराश्याने प्रत्युषाने आत्महत्या केली का, या सर्व प्रश्नांचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. बांगुर नगर पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 5:03 am

Web Title: pratyusha banerjee had an abortion before committing suicide
Next Stories
1 कोठडीतील मृत्यू रोखायचे तर शीघ्रकोपी पोलिसांना दूर ठेवा!
2 प्रक्रियायुक्त पाणी विक्रीला बागांसाठी पिण्याचे पाणी!
3 आत्महत्या रोखण्यासाठी वाशी खाडीपुलाला कुंपण?
Just Now!
X