30 September 2020

News Flash

प्रयागराज कुंभमेळा १५ जानेवारीपासून, १२ कोटी भाविक अपेक्षित

उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना गुरुवारी यांनी कुंभमेळ्याची माहिती दिली

कुंभमेळा (संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून कुंभमेळा भरविला जाणार असून या महामेळाव्यात १२ कोटी भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशचे शहर विकास मंत्री सुरेश कुमार खन्ना गुरुवारी यांनी कुंभमेळ्याची माहिती दिली. कुंभमेळाव्यातील चार मेळाव्यांपैकी प्रयागराज (अलाहाबाद) येथील कुंभमेळा महत्त्वाचा मानला जातो. दररोज २० लाख भाविक मेळाव्याला हजेरी लावतीत तर मौनी अमावस्येच्या दिवशी ३ कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कुंभसाठी येणाऱ्या भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी राज्य सरकारने अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

देशातील प्रत्येक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारी ३० प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत.  या मेळाव्यानिमित्त २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी विविध प्रदर्शने, कला दालन आदींचा समावेश आहे. देखाव्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 3:52 am

Web Title: prayagraj kumbh mela from january 15 12 million devotees expected
Next Stories
1 धुरके वाढल्याने हवेची गुणवत्ता ढासळली
2 श्वानांपाठोपाठ भटक्या मांजरांचीही नसबंदी
3 महापौर महिनाअखेरीस राणीच्या बागेत वास्तव्यास
Just Now!
X