वांद्रे टर्मिनस येथील अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या प्रीती राठी हिच्यावर हल्ला करणाऱ्याला अटक दूरच पण त्याचा सुगावा लावण्यात रेल्वे पोलिसांना अपयश आल्याचे स्पष्ट करीत प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने गुरुवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला.  
प्रीतीच्या कुटुंबियांनी न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती रेवती ढेरे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळे न्यायालयाने गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांना या प्रकरणाचा तपासासाठी सहआयुक्त पदाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले. सहा महिने उलटले तरी आरोपीला गजाआड करता आलेले नाही. त्यामुळे त्याला अटक करायची असल्यास प्रकरणाचा विशेष पद्धतीने तपास करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. रेल्वे पोलिसांना याचा योग्य प्रकारे तपास करता आलेला नाही, असेही न्यायालयाने म्हटले. जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने गुन्ह्यांना आळा घालता येऊ शकत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग काय, असा सवाल करून त्याद्वारे केवळ व्यक्तीची ओळख पटविता येते, असाही टोला न्यायालयाने हाणला.

कुलाबा येथील नौदल रुग्णालयात परिचारिका म्हणून रूजू होण्यास २ मे रोजी प्रीती मुंबईत आली होती. मात्र वांद्रे टर्मिनस येथे गाडीतून उतरल्यानंतर लगेचच एका अनोळखी तरुणाने तिच्यावर अ‍ॅसिड फेकले होत़े