15 January 2021

News Flash

संक्रमण शिबिरात म्हाडा भाडेकरूंना प्राधान्य

इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे ५८ संक्रमण शिबिरांची जबाबदारी आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या मालकीच्या संक्रमण शिबिरात यापुढे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीतील भाडेकरूंना प्राधान्य दिले जाणार आहे. ही घरे खासगी विकासकाला देण्याबाबत र्निबध आणण्याचा विचार केला जात असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले.

इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे ५८ संक्रमण शिबिरांची जबाबदारी आहे. त्यापैकी २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करण्यात आला आहे. उर्वरित संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाबाबत धोरण ठरविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मंडळाच्या ताब्यात फक्त २५ घरे आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर म्हाडाची पंचाईत होणार आहे.

उपलब्ध सदनिका..

दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे ५८ संक्रमण शिबिरातील १२ हजार १४७ सदनिका आहेत. त्यापैकी २० संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास झाल्यानंतर मंडळाला फक्त सात हजार ७३७ सदनिका मिळाल्या. त्यामुळे चार हजार ५०० सदनिकांची कमतरता आहे. संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासातून मूळ सदनिका उपलब्ध करून घेतानाच आणखी ३० टक्के अधिक सदनिका उपलब्ध व्हाव्यात, असा प्रयत्न असल्याचेही घोसाळकर यांनी सांगितले. फक्त धोकादायक इमारतीतीलच नव्हे तर प्रकल्प अर्धवट असलेल्या इमारतीतील रहिवाशांनाही संक्रमण शिबिरातील सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 1:59 am

Web Title: preference given to mhada tenants in transit camps zws 70
Next Stories
1 चेंबूरमध्ये तरुणाची हत्या
2 महम्मद अली रोडवरुन पोलिसांनी हटवले फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे पोस्टर्स
3 ते गोपनीय पत्र लीक कसं झालं? मुंबईत लोकल सुरु करण्यावरुन राजकारण?
Just Now!
X