News Flash

प्रिती झिंटा – वाडिया वाद : तारा शर्माचा जबाब नोंदविला

अभिनेत्री प्रिती झिंटा प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री या प्रकरणातील एक प्रमुख प्रत्यक्षदर्शी तारा शर्मा हिचा जबाब नोंदविला.

| July 5, 2014 04:25 am

अभिनेत्री प्रिती झिंटा प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री या प्रकरणातील एक प्रमुख प्रत्यक्षदर्शी तारा शर्मा हिचा जबाब नोंदविला. ताराने नेस वाडिया प्रितीला तीन ठिकाणी शिविगाळ करत असताना पाहिल्याचे सांगितले. तारा किंग्ज इलेव्हन संघाची कर्मचारी असून संघाची तिकीट विक्री आणि पाहुण्यांच्या व्यवस्था पाहण्याचे काम करते. या प्रकरणातील ती स्वतंत्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आपल्या जबाबात तिने तीन ठिकाणी नेस वाडिया प्रितीला शिवीगाळ करत असताना पाहिल्याचे सांगितले. याप्रकरणात नेस वाडियाने त्याच्याकडीन नऊ प्रत्यक्षदर्शींची नावे पोलिसांना सादर केली असून लवकरच त्यांचाही जबाब नोंदविला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2014 4:25 am

Web Title: preity zinta gets kings xi punjab official boost in case against ness wadia
टॅग : Ness Wadia,Preity Zinta
Next Stories
1 विद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र जिल्हाधिकाऱ्यांच्या लालफितीत
2 मुंबई बॉम्बस्फोटांचा गर्व वाटतो- यासिन भटकळ
3 आठवडाभरात जागावाटपाची चर्चा
Just Now!
X