रेल्वेप्रवास हवाई प्रवासापेक्षाही महाग; दर १० टक्के आसनांच्या आरक्षणानंतर दरांमध्ये वाढ

देशातील महत्त्वाच्या शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी विमानकंपन्या आपल्या दरांमध्ये कपात करत असताना दुसऱ्या बाजूला रेल्वेने मात्र आपल्या राजधानी, दुरांतो आणि शताब्दी या सेवांमध्ये डायनॅमिक दर आकारणी सुरू केली आहे. याआधीच दिल्ली-मुंबई मार्गावर हवाई वाहतुकीमुळे रेल्वेला फटका बसला असताना डायनॅमिक दर आकारणी केल्यास रेल्वे प्रवाशांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना हा युक्तिवाद मान्य नसून प्रवासी संख्येत फरक पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Pimpri road, road development works,
पिंपरी : रस्ते विकासाच्या ९० कोटींच्या कामात ‘रिंग’?
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरांमध्ये कमालीची कपात करत एकमेकांमध्ये स्पर्धा निर्माण केली आहे. त्याचा थेट फायदा प्रवाशांना होत असून प्रवासीदेखील जलद वाहतुकीचा उत्तम मार्ग म्हणून हवाई प्रवासाला पसंती देताना दिसतात. देशांतर्गत हवाई वाहतुकीमध्ये २०१५मध्ये १८.८ टक्क्यांची वाढ भारतात झाली होती. त्या वर्षी भारतातील ८० दशलक्ष प्रवाशांनी हवाई वाहतूक केली. यंदाच्या जुलै महिन्यातही हा कल वाढताना दिसत आहे.

याच दरम्यान सध्या या विमान कंपन्यांनी मुंबई-दिल्ली या अंतरासाठीचे तिकीट दर २२५० ते ३४०० रुपये एवढे खाली आणले आहेत. तर राजधानी एक्स्प्रेसचे याच प्रवासासाठी वातानुकूलित थ्री टिअरचे दर २०८५ रुपये एवढे आहेत. टू टिअर श्रेणीचे दर २८७० रुपये आणि प्रथम श्रेणीचे दर ४७५५ रुपये आहेत. राजधानी एक्स्प्रेस मुंबई-दिल्ली हा प्रवास पूर्ण करण्यासाठी १५ तासांपेक्षा जास्त अवधी घेते. तर विमानाने हा प्रवास जेमतेम २.१० तासांत पूर्ण होतो. त्यामुळे अगदी हजार रुपयांची बचत करण्यापेक्षा आताही प्रवासी हवाई वाहतुकीला प्राधान्य देत आहेत.

विशेष म्हणजे मुंबई-हावडा दुरांतो एक्स्प्रेसच्या दरांमध्ये आणि विमानाच्या तिकीट दरांमध्येही फार फरक नाही. दुरांतो एक्स्प्रेसचे वातानुकूलित थ्री टिअर श्रेणीचे तिकीट २६६५ रुपये एवढे आहे, तर विमान प्रवास ३५००-४००० रुपयांत होतो. या प्रवासासाठी रेल्वेने २४ तासांपेक्षा जास्त कालावधी लागतो, तर विमानाने हेच अंतर २.४५ तासांत कापले जाते.

हा आहे बदल..

आता डायनॅमिक दरप्रणाली लागू झाल्यानंतर रेल्वेतील दर १० टक्के आसनांनंतर तिकीट दरांमध्ये १० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पहिल्या १० टक्के आसनांनंतर राजधानीच्या तिकिटांत २०० रुपयांनी, त्यानंतरच्या १० टक्के आसनांनंतर २२० रुपयांनी वाढ होणार आहे. विमानाची तिकिटे दोन महिने आधीपासून आरक्षित केल्यास हे शुल्क आणखी कमी होते. पण रेल्वेच्या तिकिटांमध्ये ही सोय नसल्याने प्रवासी विमान प्रवासाला पसंती देण्याची शक्यता आहे. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवासी संख्या कमी होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. रेल्वे चालवत असलेल्या विशेष गाडय़ांची तिकिटेही डायनॅमिक दरांनी विकली जातात. या गाडय़ा पूर्ण आरक्षित असतात. राजधानी आणि दुरांतो गाडय़ांमध्ये ही दरआकारणी केली, तरी त्यामुळे प्रवासी विमान सेवेकडे वळणार नाहीत, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

फेरआढावा होणार?

नवी दिल्ली  : रेल्वेच्या अतिजलद गाडय़ांच्या दरवाढीवर चहुबाजूंनी टीका होऊ लागल्याचे पाहताच गुरुवारी रेल्वे प्रशासनाने त्याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ही दरवाढ प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली असून काही दिवसांनंतर त्याचा फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.