पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन के ल्याने त्या काळात महाराष्ट्रातील विजेची मागणी १७५० मेगावॉटने तर देशातील मागणी १२ हजार ८७९ मेगावॉटने कमी होण्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या झटक्यातून देशातील विजेचे ग्रिड सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कृती आराखडा निश्चित करून सर्व वीजनिर्मिती केंद्रे, पारेषण आणि वितरण यंत्रणांना युद्धपातळीवर कार्यान्वित के ले आहे. नऊ वाजून नऊ मिनिटांनंतर अकस्मात वाढणाऱ्या वीजमागणीच्या झटक्यातून ग्रिड सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ वीजपुरवठा करण्याची जबाबदारी देशातील जलविद्युत आणि वायूवर आधारित वीजप्रकल्पांवर टाकण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरात विविध प्रतिक्रि या उमटत आहेत. या उपक्र मामुळे ग्रिडवर काहीच परिणाम होणार नाही, असा दावा भाजपचे नेते-कार्यकर्ते करत आहेत. तर ग्रिड कोसळून देश अंधारात जाण्याचा धोका विरोधक व्यक्त करत आहेत. वीजतज्ज्ञांनी मात्र हे मोठे आव्हान असल्याचे मान्य करत त्यासाठी काटेकोर नियोजन व अचूक अंमलबजावणीच्या माध्यमातून मात करता येईल, असे मत व्यक्त के ले होते. शनिवारी के ंद्रीय ऊर्जामंत्रालय, पॉवर ग्रिड महामंडळ, विविध राज्यांच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. ग्रिड सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय-राज्य पातळीवरच्या उपाययोजना त्यात निश्चित झाल्या.

देशातील विजेच्या ग्रिडचे नियंत्रण करणाऱ्या ऊर्जा यंत्रणा संचालन महामंडळ म्हणजेच पॉवर सिस्टिम ऑपरेशन कार्पोरेशन (पोसोको) या सर्वोच्च संस्थेने कृती आराखडा जाहीर के ला. त्यानुसार वीजनिर्मिती के ंद्रे, पारेषण यंत्रणा, वितरण यंत्रणांना युद्धपातळीवर सज्जता सुरू झाली आहे. या तिन्ही यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी रविवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.  रात्री ८.५५ वाजता सर्व औष्णिक वीजप्रकल्प किमान उत्पादन क्षमतेवर आणून ठेवावेत, अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.

उपाययोजना काय?

* औष्णिक वीजप्रकल्पातील वीजनिर्मिती चटकन वाढवता येत नाही. याउलट वायूवर आधारित व जलविद्युत प्रकल्प काही मिनिटांत पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करू शकतात.

* त्यामुळे महाराष्ट्रातील कोयना-भिरासह देशातील सर्व जलविद्युत व उरणसह सर्व वायूवर आधारित वीजप्रकल्पांमधील वीजनिर्मिती क्षमता सायंकाळी सहा ते नऊ या काळात वापरली जाणार नाही. रात्री ८.५५ वाजता हे प्रकल्प के वळ किमान क्षमतेवर सुरू होतील.

* रात्री ९.०९ मिनिटांनी देशातील विजेची मागणी पुन्हा अकस्मात वाढू लागताच देशभरातील जलविद्युत-वायूवर आधरित वीजप्रकल्पांमधून मागणीच्या आलेखानुसार पूर्ण क्षमेतेने वीजनिर्मिती सुरू होईल आणि ग्रिडला बसणारा झटका रोखून ते सुरक्षित राखण्यात येईल, असे कृती आराखडय़ात स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्राचे आवाहन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के वळ घरातील विजेचे दिवे बंद करण्याचे आवाहन केले आहे. घरातील फ्रि ज, वातानुकू लन यंत्रणा, टीव्ही, पंखे आदी विजेची उपकरणे कोणी बंद करू नये. तसेच शहरे-गावांतील रस््त्यांवरील दिवे बंद होणार नाहीत याची राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी, वीजवितरण कं पनीने खबरदारी घ्यावी. तसेच रुग्णालयांतील दिवे, खासगी-सार्वजनिक इमारतींच्या आवारातील दिवे बंद करू नयेत, असेही सर्व राज्यांना पाठवण्यात आलेल्या या पत्रात नमूद केले आहे.