News Flash

लोकविज्ञान चळवळीच्या अग्रणी प्रेरणा राणे यांचे निधन

केरळप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लोकविज्ञान चळवळ’ सुरू करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यापैकी प्रेरणा राणे एक होत्या.

प्रेरणा राणे

मुंबई : सर्वसामान्य, अर्धशिक्षित समाज आणि कामगारांमध्ये विज्ञान प्रसार करून ते लोकाभिमुख करणाऱ्या आणि श्रमिकांच्या लढ्याला विज्ञानाची जोड देणाऱ्या लोकविज्ञान चळवळीच्या अग्रणी प्रेरणा राणे यांचे शुक्रवारी कणकवली येथे करोनाने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या.

केरळप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लोकविज्ञान चळवळ’ सुरू करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्यापैकी प्रेरणा राणे एक होत्या. कामगार-श्रमिकांच्या चाळी-वस्त्या, झोपडपट्ट्या आणि राज्याच्या ग्रामीण भागात पायपीट करून त्यांनी तेथील तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे कार्य लोकविज्ञान चळवळीमार्फत केले.

मॅकेनिकल अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही काळ राज्यातील एका नामांकित कंपनीत नोकरी केली. तेथे त्यांनी स्त्री-पुरुषांच्या वेतनातील तफावतीविरोधात आवाज उठवला. अखेर नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी श्रमिकांच्या मुक्ती लढ्यात आणि विज्ञान प्रसाराच्या कार्याला वाहून घेतले. काही काळ त्यांनी ‘व्हीजेटीआय’मध्ये प्राध्यापकीही केली.  अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:20 am

Web Title: prerna rane passes away akp 94
Next Stories
1 “पवारांना मजूर दिसले नाहीत, पण बारचालकांचं वीजबिल दिसलं”, आचार्य तुषार भोसलेंची टीका
2 “हे लोक अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या फार छोटी गोष्ट”, व्यावसायिकानं व्यक्त केली भिती!
3 गोष्ट मुंबईची : मध्य रेल्वेच्या स्थानकांची नावं कशी पडली?
Just Now!
X