News Flash

करोनाविरोधातील राज्याच्या लढ्याचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्यातील करोना स्थितीची माहिती घेतली.

 

मुंबई : राज्यातील करोना परिस्थिती, रेमडेसिविर, प्राणवायू आणि लसींच्या तुटपुंज्या पुरवठ्यावरून एकीकडे राज्य सरकारकडून सातत्याने कें द्रावर टीका के ली जात असतानाच दुसरीकडे राज्याच्या करोनाविरोधातील लढ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तोंडभरून कौतुक के ले. तर राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र लसीकरणासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची परवानगी देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्यातील करोना स्थितीची माहिती घेतली. करोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे अशा शब्दांत मोदी यांनी राज्याच्या यंत्रणेचे कौतुक के ले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: प्राणवायूच्या बाबतीत राज्यालाअधिक बळ मिळावे अशी विनंती मोदी यांना के ली. तसेच करोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सरकार करीत असलेल्या तयारीची माहितीही ठाकरे यांनी दिली. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे करोना लढ्यात राज्याला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, राज्याच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले.

स्वतंत्र अ‍ॅपला मान्यता द्या – राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणासाठी राज्याला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे मोदींकडे के ली आहे.

फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : मुंबईतील करोना मृत्यूंची अचूक आकडेवारी न देता चाचण्यांबाबतही तडजोडी करून करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. हे प्रकार तातडीने थांबवून प्रसिद्धी यंत्रणांमार्फत जनतेची दिशाभूल करण्यात येऊ नये, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:09 am

Web Title: prime minister lauds state fight against corona akp 94
Next Stories
1 बेस्टमध्ये वेतन संकट
2 ‘१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करावे’
3 ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’या विषयावर उद्या व्याख्यान
Just Now!
X