News Flash

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल दुरूस्ती कामामुळे उद्या, १८ मेपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोन टप्प्यात ही दुरूस्ती करण्यात येणार आहे.

| May 17, 2015 03:43 am

प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल दुरूस्ती कामामुळे उद्या, १८ मेपासून  वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दोन टप्प्यात ही दुरूस्ती करण्यात येणार आहे.
दुरूस्तीच्या पहिल्या टप्प्यात एन. एस. रोडवरून डावे वळण घेऊन प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलावरून श्यामलदास गांधी मार्गाकडे जाणाऱ्या आणि श्यामलदास गांधी मार्गावरून उड्डाणपुलाकडे येणाऱ्या जड वाहनांना २४ तास बंदी करण्यात आली आहे. त्याऐवजी श्यामलदास गांधी मार्गावरून येणारी वाहने उड्डाणपूलाकडील डावे वळण घेऊन ‘श्री पाटण जैन मंडळ’ मार्गावरून एन. एस. रोडकडे जातील किंवा श्यामलदास गांधी मार्गाकडून सरळ एम. के. रोडच्या दिशेने जातील. पुलाच्या दुरूस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्हीकडच्या दिशेला पार्किंगलाही प्रतिबंध घालण्यात आला आहे. दुरूस्तीच्या दुसऱ्या टप्प्यात श्यामलदास गांधी मार्गावरून उड्डाणपुलाकडे येत डावे वळण घेऊन श्री पाटण जैन मंडळ मार्गाकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी थेट पुलावरून सरळ एन. एस. रोडकडे जाता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 3:43 am

Web Title: princess street flyover closed from today
Next Stories
1 कोकणासाठी मध्य रेल्वेच्या आणखी गाडय़ा
2 पोलीस निरीक्षक बेकनाळकर यांचे निधन
3 अंधेरीत स्टुडिओला आग
Just Now!
X