मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून गेले आठवडाभर विविध विभाग आणि प्रश्नांचा आढावा घेणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रथमच प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल केले. सरकारच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून भूषण गगराणी आणि विकास खारगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अन्य काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यापासून गेले दहा दिवस विविध विभागाच्या आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे. बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या तडकाफडकी बदल्या करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यालयात मात्र कोणाचीच नियुक्ती केली नव्हती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव भूषण गगराणीच गेले काही दिवस मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी सांभाळत होते. प्रारंभी सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांचीच मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होईल अशी चर्चा राजकीय आणि मंत्रालयीन वर्तुळात रंगली होती. आता अजोय मेहता यांच्यानंतर मुख्य सचिव पदाची माळ कुंटे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे सचिव या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांनी आज प्रशासनात फेरबदल करताना गगराणी यांचा मुख्यमंत्री कार्यालयातील कामाचा अनुभव लक्षात घेत त्यांनाच पुन्हा एकदा आपले प्रधान सचिव म्हणून नियुक्त केले आहे. तसेच वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही अधिकारी मूळ कोल्हापूरचे आहेत.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
The decision to take Eknath Shinde and Ajit Pawar along with them is the BJP leaders in the state
एकनाथ शिंदे,अजित पवार यांना बरोबर घेण्याचा निर्णय राज्यातील भाजप नेत्यांचाच! केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा
gujrat health minister mansukh mandaviya
मोले घातले लढाया : करोनाकाळातील ‘संकटमोचक’
punjab cm bhagwant maan may arrest
अरविंद केजरीवालांनंतर आता मुख्यमंत्री भगवंत मान यांचा नंबर? पंजाबमधील मद्य धोरणाच्या चौकशीनंतर ‘आप’मध्ये भितीचे वातावरण

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाच्या व्यवस्थापैकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. तर महापालिका प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तपदी डॉ. विनायक निपुण, विक्रीकर विभागात सहआयुक्तपदी आनंद रायते, अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अमोल येडगे तर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी के. एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सचिन कुर्वे यांची महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.