News Flash

मुंबई : परळ गावात गोडाऊनला भीषण आग

आजुबाजूला वस्ती असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती.

मुंबईतल्या परळ गावातील मुकुंद आनंद नगर परिसरात असलेल्या एका गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. शनिवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास येथील प्रिंटिंग प्रेसच्या गोडाऊनला आग लागली होती. ही आग अग्निशमनच्या जवानांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजे रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विझवली.

आजुबाजूला वस्ती असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणं गरजेचं होतं. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. पण सुदैवाने घटनेत कोणीतीही हानी झालेली नाही. अरुंद गल्ल्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. बाजुलाच एका जागी बांधकाम सुरु होतं. तेथील मोकळ्या जागेच्या सहाय्याने अखेर अग्निशमन दलाचे जवान आतमध्ये पोहोचले. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश मिळालं. रात्री ९ वाजता आग विझवण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2019 1:38 pm

Web Title: printing press godown catches fire in parel village mukund anna nagar sas 89
Next Stories
1 मुंबई : मालाडमध्ये सिलिंडरच्या स्फोटानंतर भिंत कोसळली, एकाचा मृत्यू तर चार जखमी
2 रेल्वे रुळाला तडे; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
3 आसामच्या धर्तीवर मुंबईतही ‘एनआरसी’ लागू करा , शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची मागणी
Just Now!
X