रेल्वे बोर्डाने तात्काळ रेल्वे तिकिटाच्या दरात वाढ केली असून १ एप्रिलपासून ती अमलात येणार आहे. ही वाढ तिकिटाच्या मूळ भाडय़ात करण्यात आली आहे.
या भाडेवाडीनुसार, आरक्षित दुसऱ्या वर्गाच्या कुर्सीयानसाठी १० टक्के तर अन्य सर्व वर्गाच्या तिकिटासाठी ३० टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित कुर्सीयानसाठी कमीत कमी १० तर जास्तीत जास्त १५ रुपये वाढ होणार आहे. शयनयानच्या तिकिटासाठी तात्काळमध्ये किमान ९० रुपये तर कमाल १७५ रुपये, वातानुकूलित कुर्सीयानसाठी किमान १०० तर कमाल २०० रुपये, तृतीय वातानुकूलित श्रेणीसाठी किमान २५० तर कमाल ३५० रुपये आणि द्वितीय वातानुकूलित श्रेणीसाठी तसेच एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी किमान ३०० तर कमाल ४०० रुपये तात्काळ शुल्क लागू होणार आहे.