News Flash

राज्यातील कैद्यांची कर्करोग, मानसिक आरोग्याची तपासणी

आजघडीला राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे ३४ हजार कैदी असून अनेक तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवलेले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

संदीप आचार्य

राज्यातील बहुतांश तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे अनेक कैद्यांना मानसिक आजार, कर्करोग, त्वचारोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह अनेक आजार जडतात. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने राज्यातील सर्वच तुरुंगांमधील कैद्यांची तपासणी करण्याचे काम हाती घेतले आहे.

असांसर्गिक आजारांचे देशातील व राज्यातील वाढते प्रमाण लक्षात घेऊन आरोग्य विभागाने महाराष्ट्रात मधुमेह व उच्च रक्तदाबाची व्यापक तपासणी मोहीम यापूर्वीच राबविली आहे. तथापि, तुरुंगातील कैदी हे र्सवकष आरोग्य तपासणीतील दुर्लक्षित घटक असल्याचे लक्षात घेऊन आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी राज्यातील तुरुंगांमधील सर्व कैद्यांची मधुमेह, रक्तदाब, मानसिक आरोग्य, तीन प्रकारचे कर्करोग (मुख, स्तन आणि सव्‍‌र्हायकल), तसेच डोळ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आगामी १५ दिवस असांसर्गिक आजार तपासणी मोहिमेंतर्गत डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ५४ तुरुंग असून यात १३ खुले तुरुंग आहेत. याशिवाय ९३ दुय्यम कारागृहे आहेत. आठशेहून कैदी ठेवण्याची क्षमता असलेले नऊ तुरुंग, तर ३०० ते ८०० कैदी ठेवण्याची क्षमता असलेले १९ तुरुंग आहेत. आजघडीला राज्यातील सर्व तुरुंगात मिळून सुमारे ३४ हजार कैदी असून अनेक तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवलेले आहेत.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांची पथके..

यासाठी आरोग्य अधिकारी, स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, कर्करोग तसेच मानसोपचारतज्ज्ञांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सकांच्या आधिपत्याखाली आगामी १५ दिवस ही तपासणी करण्यात येईल. या तपासणीत कॅन्सर अथवा अन्य आजारांचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील.

केंद्राच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून असांसर्गिक आजारांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात कोणताही घटक सुटू नये याची काळजी घेण्यात येत आहे. आदिवासी जिल्हे, दुर्गम भाग, शालेय मुले तसेच तुरुंगातील कैद्यांची या योजनेत तपासणी केली जात आहे.

– डॉ. साधना तायडे, आरोग्य संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 1:58 am

Web Title: prisoners cancer mental health check up abn 97
Next Stories
1 मुंबईतील मोठय़ा सोसायटय़ांना बायोगॅस प्रकल्प बंधनकारक
2 मुंबईतही दमदार आरंभ
3 विद्यार्थ्यांची नियम मोडून वाहतूक सुरूच
Just Now!
X