स्थानिक कार्यकर्त्यांचीही साथ

मुंबई : करोनाचा फैलाव मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्या, झोपडपट्ट्यांमध्ये झटपट होण्याची शक्यता गृहीत धरून घाटकोपर (पूर्व ) येथील रमाबाई आंबेडकरनगर व कामराजनगरमधील खासगी डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने करोनाविरुद्धची सामूहिक लढाई सुरू केली आहे.

या दोन्ही वस्त्यांमध्ये लहान लहान जागेत दवाखाने आहेत. तेथे गर्दी होणे स्वाभाविक आहे. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने झोपडपट्ट्यांमध्ये सामाजिक अंतर कसे पाळायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या रमाबाईनगर व कामराज नगरमधील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लहान लहान दवाखाने चालविणाऱ्या डॉम्क्टरांशी संपर्क के ला. करोनापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावा असे आवाहन त्यांना के ले.

याला प्रतिसाद देत या दोन्ही वसाहतींतील खासगी डॉक्टरांनी एकत्र येऊन करोनाचा प्रतिबंध कतानाच, नागरिकांना इतर आजारावरही तातडीने औषधोपचार मिळावेत, यासाठी एकाच ठिकाणी सामूहिकरीत्या बाह्य़ रुग्ण विभाग सुरू करण्याचे ठरविले. त्यानुसार रमाबाईनगरमधील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय के ंद्रा’च्या इमारतीत मोफत उपचार व मोफत औषधवाटप हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या  दोन्ही वसाहतींतील दररोज पाच डॉम्क्टर मोफत सेवा देत आहेत. ‘शहीद स्मारक समिती’च्या वतीने मोफत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. सभागृह वेळोवळी  निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे, तसेच तापसणीसाठी येणाऱ्यांची गर्दी होणार नाही, सामाजिक अंतर राखले जाईल, याची खबरदारी  स्वत डॉक्टर व कार्यकर्ते घेत आहेत. या उपक्रमाचा स्थानिकांना चांगला फायदा होत आहे.

डॉक्टरांची फळी

या उपक्रमात डॉ. विपुल दोशी, डॉ. दिलीप लोखंडे, डॉ. अजय जाधव, डॉ. लक्ष्मण पाखले, डॉ. किरण कामत, डॉ. पल्लवी अहिरे, डॉ. अर्चना अमोलिक, डॉ, भविन संचानिया, डॉ. संतोष गुप्ता, डॉ. करुणा सोनावणे, डॉ.यशवंत मोरे, डॉ. स्नेहल अहिरे, डॉ. ज्योत्स्ना नलावडे, डॉ. प्रमोद सोनावणे, डॉ. मनीषा पाटील, डॉ. सहानिक नाईक,  तसेच नामदेव उबाळे, चिंतामण गांगुर्डे, काका गांगुर्डे, आनंद शिंदेकर, विनोद शिंदे, पद्माकर धेनक, संजय के दारे, राजा गांगुर्डे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.