अनेकदा वादात अडकणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ‘मराठीद्वेष्टे’ असल्याप्रमाणे ‘ट्विट’ केल्याने त्यांच्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग केल्याची नोटीस देण्यात आली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ही नोटीस दिली आहे.
 ‘मराठी असल्याचा अभिमान आहे’
विधानसभेत अतुल भातखळकर व अन्य सदस्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट दाखविण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे मंगळवारी विधानसभेत सांगितले होते. त्याविरोधात शोभा डे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मल्टीप्लेक्समध्ये आता पॉपकॉर्नऐवजी दहीमिसळ व वडापाव खायला मिळेल, असे मत नोंदवून मराठी भाषेचा व मराठी माणसांचा अवमान होईल, अशी उपहासात्मक विधाने केल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.