News Flash

तृतीयपंथीय समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादी पक्षाची मी आभारी आहे असे प्रिया पाटील यांनी म्हटले आहे

तृतीयपंथीय समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याची जबाबदारी देण्यात आली. प्रिया पाटील यांना या संदर्भातले पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले. समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांना एकत्र आणण्याचे काम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच पुढाकार घेतला आहे असे म्हटले. आघाडी सरकार असताना २००४ मध्ये संजय गांधी योजनेचा लाभ ट्रान्सजेन्डर्सनाही देण्यात आला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रिया पाटील यांचे स्वागत केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ट्रान्सजेन्डर्ससाठी काम करत आहोत. त्यात प्रिया पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. ३७७ बिलच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आहे, आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे लोक आहोत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मला ही संधी दिली त्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचे प्रश्न सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी यापुढे याच पक्षासोबत एकनिष्ठ राहिन असंही प्रिया पाटील म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2019 9:31 pm

Web Title: priya patil the leader of the third party community joins ncp today
Next Stories
1 मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोदी सरकारचे गिफ्ट, ‘एमयूटीपी ३ ए’ प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी
2 समुद्राच्या उधाणामुळे नुकसान झाल्यास आता शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
3 ‘लोकसत्ता’ सहकारी बँकिंग परिषदेत समस्या, उपायांचा वेध
Just Now!
X