अनधिकृत बांधकामप्रकरणी मुंबई महानगर पालिकेनं अभिनेत्री प्रियांका चोप्राला नोटीस बजावली होती. याप्रकरणी आता प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी महापालिकेला उपरोधिक टोला लगावला आहे. महापालिकेचा प्रश्न सुटला का असा प्रश्न विचारला असता, महापालिकेचे प्रश्न निर्माण का होतात हे तुम्हा- आम्हाला ठाऊक आहेतच, अशा शब्दांत त्यांनी टोमणा मारला.

मुंबईतील एका कार्यक्रमात मधू चोप्रा यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना महापालिकेच्या नोटीशीबाबत प्रश्न विचारला. अनधिकृत बांधकामाच्या प्रश्नावर तोडगा काढत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

अंधेरी पश्चिममधील ओशिवरा येथील एका व्यापारी संकुलातील जागा प्रियांकाने भाड्याने दिली आहे. या जागेत अनधिकृतरित्या बांधकाम करण्यात आल्याचं पालिकेच्या तपासणीत समोर आले होते. त्यावेळी पालिका अधिकाऱ्यांनी वास्तू प्रिसिंक्ट बिल्डिंगमधील प्रियांकाच्या ऑफीसला भेट दिली. या ऑफीसमध्येही नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. म्हणूनच पालिकेकडून प्रियांकाला दोन नोटीस बजावण्यात आल्या होत्या.

https://www.instagram.com/p/BlUiHZZF09S/