News Flash

‘मुंबई शॉपिंग फेस्टिवल’चे विजेते पुरस्काराने सन्मानित

‘मोहन ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिवल’ची ‘युनियन बँक’ सहकारी पार्टनर आहे.

‘मुंबई शॉपिंग फेस्टिवल’चे विजेते पुरस्काराने सन्मानित

प्रथम वैभवी हनुमंत लोके, तर द्वितीय पुरस्कार विजय तोरसकर यांना प्रदान
‘लोकसत्ता’च्या आयोजित ‘मुंबई शॉपिंग फेस्टिवल’च्या भाग्यवान विजेत्यांचा बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच नरिमन पॉइंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये उत्साहात पार पडला. या वेळी प्रथम विजेत्या वैभवी हनुमंत लोके यांना ‘कलानिधी ठाणे’चे अमित कारिया यांच्या हस्ते ‘कार’ची चावी देण्यात आली. तर द्वितीय पारितोषिक विजेते विजय तोरसकर यांना ‘केसरी टूर्स’चे प्रमोद दळवी यांच्या हस्ते सिंगापूर थायलँड येथील टूर्सचे बक्षीस देण्यात आले. या सोहळ्याला विजेत्यांच्या कुटुंबीयांनी आवर्जून हजेरी लावली होती.
‘मी यापूर्वी अनेक वेळा गाडी घेण्याचे स्वप्न पाहिले होते. पण, माझे स्वप्न असे पूर्ण होईल, याचा कधी विचारच केला नव्हता. पण, ‘लोकसत्ता’ने ते प्रत्यक्षात उतरवले,’ अशी प्रतिक्रिया वैभवी लोके यांनी व्यक्त केली. तर ‘मी भारत भ्रमंती केली आहे. पण कधीही परदेशवारीला गेलो नव्हतो. माझ्या पत्नीलादेखील फिरण्याची खूप आवड आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचे आमचे स्वप्न ‘लोकसत्ता’मुळे पूर्ण झाले,’ अशी शब्दांत भावना तोरसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘गेली अनेक वर्षे ‘लोकसत्ता’ आणि ‘केसरी’चे नाते अभेद्य आहे. लोकसत्ता नेहमीच वेगवेगळ्या कल्पना लोकांसमोर मांडत असते,’ असे मत केसरी टूर्सचे प्रमोद दळवी यांनी व्यक्त केले. या वेळी प्राजक्ता नर, सुनीता जोशी, पंकज गांगण, अनिल घाडी यांना एलईडी टीव्ही, प्रभावती गाडगीळ यांना म्युझिक सिस्टीम तर तन्वी बागणे, महेशकुमार जरे, नीलिमा पाठारे, वसुधा राजापूरकर यांना वॉटर प्युरिफायर बक्षीस मिळाले.
‘मोहन ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मुंबई शॉपिंग फेस्टिवल’ची ‘युनियन बँक’ सहकारी पार्टनर आहे. पॉवर्ड बाय ‘अपना बाजार को.ऑ.’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी’ तर मेगा गिफ्ट पार्टनर ‘कलानिधी ठाणे’ आहेत. गिफ्ट पार्टनर आहेत आर्ट व्ह्य़ू, अजय अरविंदभाई खतरी, केंब्रिज, ईश प्रज्ञा साडी, मनोरंजन, वास्तु रविराज, विलपॉवर आणि हेल्थ पार्टनर मॉडर्न होमिओपॅथी हे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 3:14 am

Web Title: prizes distribution to mumbai shopping festival winners
Next Stories
1 शहरबात : प्रवाशांच्या नुकसानाचे काय?
2 ‘रोशनी’च्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश!
3 जोगेश्वरीत सरकत्या जिन्यांचा स्कायवॉक
Just Now!
X