30 September 2020

News Flash

प्राध्यापकांनाही परीक्षा नको!

विरोध करण्यासाठी संघटनेची हस्तक्षेप याचिका

(संग्रहित छायाचित्र)

विरोध करण्यासाठी संघटनेची हस्तक्षेप याचिका

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आता प्राध्यापकही उतरले आहेत. प्राध्यापकांच्या ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन’ (एमफुक्टो) या प्राध्यापक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विविध राज्यांतील विद्यार्थी, युवासेना यांनी दाखल केलेल्या या याचिकेत आता ‘परीक्षा नको’ अशी भूूमिका मांडत प्राध्यापक संघटनेनेही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे.

प्राध्यापकांचे म्हणणे काय?

‘सद्य:स्थितीत राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षा घेणे शक्य नाही. आयोगाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात जवळपास ११ लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागेल. जे सद्य:स्थितीत शक्य नाही.  एका परीक्षा कक्षात ४० विद्यार्थी असतात. सद्य:स्थितीत अंतराच्या निकषांचा विचार करता २० विद्यार्थ्यांना वर्गात बसवावे लागेल. त्यानुसार ६० ते ७० हजार प्राध्यापकांना पर्यवेक्षक  म्हणून काम करावे लागेल.

सद्य:स्थितीत प्राध्यापकांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. मोबाइल फोनवरून परीक्षा घेता येऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांकडे संगणक असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडे साधने उपलब्ध नाहीत. आयोगाच्या अनेक नियमांची अंमलबजावणी करण्यात विद्यापीठांनी गोंधळ घातले आहेत. त्यामुळे पात्रताधारक शिक्षक उपलब्ध नाहीत. मात्र, त्याबाबत आयोग गंभीर नाही,’ असे एमफुक्टोने त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:33 am

Web Title: professors union petition against exams zws 70
Next Stories
1 ‘करोनाविषयक खर्चासाठी निधी वाढवून द्या’
2 बिगर झोपडपट्टी भागांत तरुणांमध्ये अधिक संसर्ग
3 मुखपट्टय़ा, सॅनिटायजरच्या दरांवर आता नियंत्रण!
Just Now!
X