News Flash

लसीकरण केंद्रांवर राजकीय जाहिरातींना मनाई

मान्यता रद्द करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा

(संग्रहित छायाचित्र)

मान्यता रद्द करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा

मुंबई : महापालिकेच्या लसीकरण   केंद्रांबरोबरच शासकीय तसेच खासगी किं वा औद्योगिक लसीकरण के ंद्राबाहेरही राजकीय पक्षांचे फलक, जाहिराती, भित्तीचित्रे लावण्यास पालिका प्रशासनाने मनाई के ली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, असाही इशारा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.

पालिके च्या लसीकरण के ंद्रावर कोणत्याही पक्षाने जाहिरात करणारी किं वा श्रेय घेणारी फलकबाजी लावू नये असे आदेश पालिका आयुक्तांनी ३ जून रोजी काढले होते. मात्र गेल्या दहा दिवसात त्यात काही फरक पडला नाही. अनेक ठिकाणी लसीकरण के ंद्रांच्या बाहेर राजकीय फ लक दिसत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी सोमवारी पुन्हा एकदा परिपत्रक काढून राजकीय फलकबाजी बंद करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचे सतत उल्लंघन होत असल्यामुळे आयुक्तांनी अधिक कडक मार्गदर्शक सूचना लसीकरण के ंद्रांना आखून दिल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी अशा जाहिराती करणे उचित नाही, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

पालिका, शासकीय अथवा खासगी लसीकरण केंद्र, तसेच औद्योगिक संस्था (विविध कं पन्या व कार्यालये) व गृहसंकु ल येथेही खासगी लसीकरण उपकेंद्रांवर राजकीय जाहिराती, भित्तिपत्रे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. काही लोकप्रतिनिधी खासगी लसीकरण केंद्र आणि गृहनिर्माण संस्था व खासगी कं पन्या यांच्यात समन्वय साधून श्रेय घेत आहेत. त्यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न आयुक्तांनी के ला आहे.

खासगी संस्थांशी करार अनिवार्य : खासगी लसीकरण केंद्रांना गृहनिर्माण संस्था किं वा औद्योगिक संस्थांमध्ये लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या केंद्रांनी संस्थांशी सामंजस्य करार करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या करारात खासगी लसीकरण केंद्रामार्फत उपलब्ध असलेले वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिके ची व्यवस्था याबाबत स्पष्टपणे उल्लेख करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

बाहेरील केंद्रांना मुंबईत बंदी!

मुंबईबाहेरील  लसीकरण केंद्राला मुंबईत लसीकरण करण्याची परवानगी मिळणार नाही, असेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट के ले आहे. या सर्व नव्या नियमांपैकी कोणत्याही नियमाचे उल्लंघन के  ल्यास या केंद्राला कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल आणि मान्यताही रद्द के ली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 3:41 am

Web Title: prohibition of political advertisements on vaccination centers zws 70
Next Stories
1 घरोघरी लसीकरणाला सध्या तरी परवानगी नाही!
2 प्रवाशांचे आणखी हाल
3 पूर्व उपनगरांतील पदपथ धोकादायक
Just Now!
X