News Flash

अप्पर लोखंडवालातील आठ कोटींच्या फ्लॅट विक्रीस मनाई!

ओशिवरा येथील अप्पर लोखंडवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील आठ ते १७ कोटी रुपये किमतीच्या आलिशान फ्लॅटच्या विक्रीस नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने अंतरिम स्थगिती दिली आहे.

| January 30, 2014 12:05 pm

ओशिवरा येथील अप्पर लोखंडवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील आठ ते १७ कोटी रुपये किमतीच्या आलिशान फ्लॅटच्या विक्रीस नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने अंतरिम स्थगिती दिली आहे. ३८ मजल्यांचे हे टॉवर उभारताना सागरी हद्द नियंत्रण कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप न्यायाधीकरणाने मान्य केला आहे. पुढील सुनावणीपर्यंत तूर्तास हा आदेश जारी केला आहे.
माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी समाज कार्यकर्ते अमित मारू यांच्या वतीने ही याचिका दाखल केली आहे. ‘सीआरझेड- १’ मध्ये हा परिसर येत असतानाही नियमांचे नीट पालन करण्यात आले नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. या प्रकरणी तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली नाही, असे या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.विंडसर रिएलिटी प्रा. लि. यांच्यामार्फत ओशिवरा येथील मेगा मॉलशेजारी या ३८ मजली दोन आलिशान टॉवर्सचे काम सुरू आहे. तीन ते चार हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या किमान आठ तर कमाल १७ कोटी रुपये किमतीच्या या सदनिकांचे आरक्षण सुरू आहे. मात्र न्यायाधीकरणाने यापुढे त्यास स्थगिती देणारा आदेश जारी केला आहे.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2014 12:05 pm

Web Title: prohibition of sale flat of eight crore at upper lokhandwala
टॅग : Flat
Next Stories
1 असुरक्षित नगरसेविकेच्या मदतीला विधिमंडळ महिला हक्क व कल्याण समिती
2 ‘शुभमंगल’ योजनेचा लाभ निराधार, परित्यक्ता व विधवांच्या मुलींनाही
3 ‘घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्यात महिलांविरुद्ध गुन्हा का नाही?’
Just Now!
X