देशात दलित, आदिवासी, महिला व कमकुवत वर्गावर होणारे सामाजिक अत्याचार, तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी या विवेकवादी-पुरोगामी विचारवंत-कार्यकर्त्यांचे करण्यात आलेले खून, त्यामुळे वाढीस लागलेल्या संघटित दहशतवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी व डाव्या संघटनांच्या वतीने २१ ते २४ नोव्ंहेबरदरम्यान पुणे ते कोल्हापूर अशी संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.
प्रबोधन व संघर्ष अशा दोन्ही स्तरांवर सामाजिक अत्याचाराचा मुकाबला करण्यासाठी गेल्या वर्षी फुले-आंबेडकरवादी व डाव्या विचारांच्या पक्ष-संघटनांनी एकत्र येऊन एक कृती समिती स्थापन केली आहे.