08 March 2021

News Flash

‘आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरचा ठिय्या सुरुच राहणार’

पत्रकार परिषदेत मराठा बांधवांनी घेतली आक्रमक भूमिका

आरक्षण मिळेपर्यंत मराठा बांधवांचं आझाद मैदानावर सुरुच राहणार अशी आक्रमक भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. मराठा समाजाचं आरक्षण कोर्टात टिकावं ही जबाबदारीही सरकारचीच असेल असेही आंदोलकांनी म्हटलं आहे. आझाद मैदानावर मराठा आंदोलकांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन सुरुच राहणार असं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही जेव्हा आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता झालेली नाही. शासनाने फक्त घोषणा केली आहे. आम्हाला कागदोपत्री आणि लाभ मिळणारं आरक्षण हवंय. घोषणाबाजी नको. नेत्यांनी मराठा आरक्षणाचं राजकारण करू नये अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे. काही मराठा बांधव आझाद मैदानाच्या दिशेने येताना त्यांची मुस्कटदाबी केली जाते आहे. हे आम्ही मुळीच सहन करणार नाही. २०१७ मध्येही मुंबईत आम्ही मोर्चा काढला होता. मात्र तेव्हाही आश्वासन दिलं होतं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि आरक्षणाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचं आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे.

मागील महिन्यात १३ हजार सातशे मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यासंदर्भात एक समिती स्थापण्यात आली. या समितीची एकही बैठक आजपर्यंत झालेली नाही आणि एकही गुन्हा मागे घेण्यात आलेला नाही ते लवकरात लवकर मागे घेतले जावेत असेही मराठा बांधवांनी म्हटले आहे. मागील चार दिवसात चाकणच्या काही आंदोलकांची आणि इतर आंदोलकांची धरपकड करण्यात आली. मराठा भगिनींनाही त्रास देण्यात आला आणि मुंबईकडे येण्यास मज्जाव करण्यात आला हेदेखील आम्ही सहन करणार नाही असेही मराठा बांधवांनी म्हटले आहे. भगवा झेंडा गाडीला लावण्यास मज्जाव करण्यात येतो आहे. मात्र त्यांनाही रोखलं जातंय ही बाबदेखील सहन केलं जाणार नाही असंही मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 4:36 pm

Web Title: protest on azad maidan will not over till we get reservation says maratha protesters
Next Stories
1 मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण ?
2 विरोधकांचा मराठा आरक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न नाही : अजित पवार
3 दिलासादायक..! सहा आठवड्यात पेट्रोल १२ रूपयांनी स्वस्त
Just Now!
X