News Flash

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी हिशेबात चुका

राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी हिशेबात चुका असल्याचे मान्य करूनही त्या दुरुस्त करण्यासाठी पावले टाकली जात नाहीत. महालेखापाल विभागातील माजी कर्मचारी श्रीपाद देवधर

| February 25, 2013 02:45 am

राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी हिशेबात चुका असल्याचे मान्य करूनही त्या दुरुस्त करण्यासाठी पावले टाकली जात नाहीत. महालेखापाल विभागातील माजी कर्मचारी श्रीपाद देवधर यांनी गेली काही वर्षे अर्थ विभागाशी पत्र्यव्यवहार आणि उच्चपदस्थांच्या भेटी घेऊनही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
१९८६-८७ पासून भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर अनेकदा बदलले. महागाई भत्त्याची थकबाकी, वेतन आयोग निश्चिती फरकाची रक्कम त्यात जमा करण्यात आली. ज्या तारखेपासून हे निर्णय लागू झाले, तेव्हापासून त्यावरील व्याज जमा केले गेले नाही. निधीतून कर्मचारी कर्ज काढतो व त्याची परतफेड करतो. याबाबतचे हिशेब चुकीच्या पध्दतीने केले जातात. त्याचबरोबर चक्रवाढव्याज चुकीच्या पध्दतीने काढले जात असून देवधर यांनी त्याचे कोष्टक तयार केले आहे. यासंदर्भात त्यांची अर्थ सचिव सुनील सोनी यांच्याबरोबर ५ जुलै १९८८ रोजी बैठकही झाली होती आणि सोनी यांनी काही निर्णय घेतले. पण आजतागायत त्यासंदर्भात अंमलबजावणी झाली नसल्याचे देवधर यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:45 am

Web Title: provident fund accounting mistakes of class four employee
Next Stories
1 चुलत्यावर अ‍ॅसिड हल्ला
2 पश्चिम- मध्य रेल्वेवरील दोन फाटक बंद
3 बबन मिंडे यांच्या ‘कॉमन मॅन’ला सुभाष भेंडे पुरस्कार