|| संदीप आचार्य

Swimmer dies after drowning in lake
नागपूर : धक्कादायक! पोहण्यात तरबेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
govandi shatabdi hospital marathi news
मुंबई: गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ईसीजी तंत्रज्ञांअभावी रुग्णांचे हाल
electricity bills arrears of government institutions
शासकीय आस्थापनांची साडे आठ कोटींची वीजदेयकांची थकबाकी; महावितरणला आर्थिक फटका

१०० वर्षे जुन्या इमारतीचा छताचा भाग कोसळला; १०२ मनोरुग्णांचे अन्यत्र स्थलांतर

मुंबई : तब्बल १०० वर्षांहून जुने असलेले ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय हे तेथील मनोरुग्ण व कर्मचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. दोनच दिवसांपूर्वी येथील इमारतीच्या छताचा मोठा भाग कोसळला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने येथील १०२ मनोरुग्णांना तातडीने अन्यत्र हलवले आहे. गंभीर बाब म्हणजे ठाणे मनोरुग्णालयाच्या दुरुस्तीसाठी किमान २४ कोटी रुपयांची आवश्यकता असून गेली दोन वर्षे सातत्याने याची मागणी करूनही आजपर्यंत फुटकी कवडीही मिळालेली नाही.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या इमारत क्रमांक १३ व १४ मधील छताचा भाग दोन दिवसांपूर्वी कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील रुग्ण तात्काळ अन्यत्र हलविण्यास सांगितले. त्यानुसार इमारत क्रमांक १३ मधील ७१ मनोरुग्ण व १४ मधील ३१ मनोरुग्ण असे १०२ रुग्ण अन्यत्र हलविण्यात आले आहेत. तथापि करोनाची साथ लक्षात घेता या रुग्णांना सुरक्षित अंतरावर ठेवणे शक्य नसल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

ठाणे मनोरुग्णालय शंभर वर्षे जुने असून येथे एकूण ७३ इमारती आहेत. यात पुरुष रुग्णांसाठी १४ तर स्त्री रुग्णांसाठी १५ इमारती आहेत. यातील पुरुष मनोरुग्णांसाठीच्या सात तर स्त्री विभागातील पाच अशा १२ इमारती धोकादायक बनल्या आहेत. २०१७ साली या इमारतींचे ऑडिट करण्यात आले तेव्हापासून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून इमारत दुरुस्तीसाठी वारंवार निधी मागितला जात आहे. दोन वर्षांपूर्वी इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आल्यानंतर येथील इमारतींच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांचे प्रस्तावही पाठविण्यात आले. मात्र आजपर्यंत एक रुपयाही दुरुस्तीसाठी देण्यात आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आगामी पावसाळ्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती झाली नाही तर येथील काही इमारती कोसळून मोठी दुर्घटना होईल, अशी भीती येथील डॉक्टर व्यक्त करत आहेत.

मनोरुग्णालयात गेल्या काही वर्षांत छताचा भाग कोसळून तसेच गंजलेले ग्रिल पडून तसेच तुटलेल्या फरशांमध्ये अडकून पडल्यामुळे रुग्ण जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रुग्णालयातील जिने हे धोकादायक बनले आहेत. रेल्वे मार्गाच्या शेजारी असलेल्या या इमारतींना रेल्वे गाड्यांच्या ये-जा करण्यामुळे हादरे बसतात. अशा हादऱ्यांमुळे इमारतीच्या ‘बीम’चेही नुकसान झाले आहे. इमारतींतील सांडपाणी निचरा यंत्रणा तसेच अंतर्गत रस्ते कमालीचे खराब झाले असून पावसाळ्यात येथे काम करणे ही नरकयातना असल्याचे येथील सफाई कर्मचारी सांगतात.        (पूर्वार्ध)

रुग्णालयातील अनेक इमारती धोकादायक असून दुरुस्तीसाठीचे प्रस्ताव आम्ही आरोग्य विभागाकडे पाठवले आहेत. परवा छताचा मोठा भाग कोसळल्यानंतर येथील १०२ रुग्णांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र आगामी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. – डॉ. संजय बोदडे, वैद्यकीय अधिक्षक, ठाणे मनोरुग्णालय