07 March 2021

News Flash

स्वच्छतेच्या जनआंदोलनामुळे हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानात लोकसहभागातून स्वच्छतेचे जनआंदोलन उभे राहिल्यामुळेच राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली असून महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. केवळ शहराचे रस्ते दुरुस्त करून मते लाटता येतील ही संकल्पना जुनी झाली असून आता शहरे स्वच्छ केली तरच लोक मते देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉìमग आर्ट्स (एनसीपीए) मध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, नगरपालिका (प्रशासन) संचालनालयाचे आयुक्त वीरेंद्रसिंग उपस्थित होते. देशातील नागरिकांना शौचालयासाठी उघडय़ावर जावे लागणे ही लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली. राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियानात अवघ्या दीड वर्षांच्या आत राज्यातील १०० शहरे हागणदारीमुक्त झाली. लोकसहभागातून हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

देशातील ११८ हागणदारीमुक्त शहरांमध्ये राज्यातील ५२ शहरांची निवड झाल्यामुळे हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरले असून येत्या २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत संपूर्ण नागरी महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हागणदारीमुक्त व स्वच्छ शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने नॅशनल इन्व्हायरन्मेंट इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी) व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) यांच्यासोबत सामंजस्य करारही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

नगराध्यक्षांचा सत्कार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते खापा, देवळाली-प्रवरा, संगमनेर, सटाणा, देवरुख, लांजा, कणकवली, बारामती, दौंड, जुन्नर, लोणावळा, भोर, विटा, उरण, इस्लामपूर, आष्टा, तासगाव, कळमेश्वर, मौदा, नरखेड, भंडारा, तुमसर, पवनी, पुलगाव, देवळी, नंदुरबार, येवला, सावंतवाडी, वैभववाडी, कुडाळ, देवगड-जमसांडे, खोपोली, पंढरपूर, आळंदी, राजगुरुनगर, पाथरी, उमरी या हागणदारीमुक्त शहरांचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, भंडाराचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्यासह जळगांव व बुलाढाणाचे जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी यांचाही सत्कार करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 12:14 am

Web Title: public movement for cleanliness campaign in maharashtra
Next Stories
1 मराठा आरक्षणाबाबत न्यायालयाने सरकारला फटकारले नाही
2 बेहरामपाड्यात पाचमजली झोपडी कोसळली; सहाजणांचा मृत्यू
3 मला जिवे मारण्याचा कट; किरीट सोमय्यांची पोलिसांकडे तक्रार
Just Now!
X