19 September 2020

News Flash

आमदाराची पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

पालिका कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर काढल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी एकनाथ शेट्टे यांना जबर मारहाण करून त्यांना तब्बल तीन

| June 15, 2013 02:38 am

पालिका कर्मचाऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर काढल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कर्मचारी एकनाथ शेट्टे यांना जबर मारहाण करून त्यांना तब्बल तीन तास कार्यालयात कोंडून ठेवले. शुक्रवारी सकाळी डोंबिवली येथील बैलबाजार परिसरात ही घटना घडली. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी सातही प्रभाग क्षेत्रातील पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी ‘काम बंद’ आंदोलन केले. या प्रकरणी आमदार गायकवाड यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी आमदार गायकवाड यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी शहरभर बॅनरबाजी केली होती. सकाळी पालिकेच्या ‘क’ प्रभाग क्षेत्रातील अतिक्रमणविरोधी पथकाचे प्रमुख एकनाथ शेट्टे कर्मचाऱ्यांसह बॅनर हटविण्याचे काम करत होते. कारवाई सुरू असतानाच आमदार गायकवाड कार्यकर्त्यांसह येथे आले आणि बाचाबाचीनंतर त्यांनी शेट्टे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शेट्टे यांना गाडीत डांबून त्यांच्या कार्यालयात नेण्यात आले आणि तीन तास डांबून ठेवण्यात आले. येथेही शेट्टे यांना मारहाण करण्यात आली.
‘शहरात इतरही पक्षांचे बॅनर झळकत आहेत. माझे बॅनर काढण्याची कारवाई जाणीवपूर्वक झाली आह़े माझ्यावर गुन्हा दाखल केला, तसा इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांवरही करा, अन्यथा मी जामीन घेणार नाही,’ असे गणपत गायकवाड यांनी सांगितल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 2:38 am

Web Title: public representative assault employees of local body
Next Stories
1 रक्तचंदनाचा मोठा साठा जप्त
2 आंदोलनात सहभागी झाल्यास बेस्ट कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग
3 राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षाची आज निवड
Just Now!
X