अर्थव्यवस्थेसाठी सर्वार्थाने वाईट गेलेल्या वर्षांने गुंतवणूकदार वर्गाला मात्र भरभरून दिले. आता करोनाच्या छायेतून अर्थचक्र सावरत असताना, नव्याने मांडावयाचा गुंतवणुकीचा पट कसा असायला हवा, हा सर्वासाठी औत्सुक्याचा विषय आहे. याचेच उत्तर घेऊन आलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर वार्षिकांकाचे प्रकाशन, येत्या बुधवारी, १० मार्चला सायंकाळी ६ वाजता होत आहे. यानिमित्ताने गुंतवणूकदारांशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या गुंतवणूकदार साक्षरतेच्या विविधांगी उपक्रमांपैकी एक असलेल्या ‘अर्थब्रह्म’ वार्षिकांकाचे यंदाचे हे प्रकाशनाचे आठवे वर्ष आहे. यानिमित्ताने होत असलेल्या गुंतवणूकदार-जागराचा कार्यक्रम हा दूरचित्र-संवाद माध्यमातून होणार आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सह-प्रायोजक असलेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सनदी लेखापाल आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार तृप्ती राणे या सहभागी होत आहेत.

गुंतवणूकदारांमध्ये सध्या लोकप्रिय असलेल्या म्युच्युअल फंडांविषयी आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी महेश पाटील हे मार्गदर्शन करतील.

गुंतवणुकीसाठी उपलब्ध पर्यायातून योग्य तो पर्याय निवडताना, परताव्याच्या प्रमाणासह, जोखमीचा घटकही लक्षात घ्यावा लागतो. गुंतवणूकदाराचे वय, कौटुंबिक जबाबदाऱ्या, जोखीम सोसण्याची क्षमता, ठरविलेली आर्थिक उद्दिष्टे आणि ती साध्य करण्यासाठी उपलब्ध असलेला कालावधी यानुसार गुंतवणुकीचे प्रकारही वेगवेगळे असायला हवेत. गुंतवणूकदारांना परिचित असलेल्या ‘मालमत्ता विभाजन’ या संकल्पनेचा गुंतवणुकीत प्रत्यक्ष वापर कसा करावा, याचे मार्गदर्शन यानिमित्ताने तृप्ती राणे या करतील.

(Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.)

प्रायोजक : आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड.

सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड.

सहभागासाठी   https://tiny.cc/LS_Arthabramha_10Mar  येथे नोंदणी आवश्यक

विषय : मालमत्ता विभाजनातून संपत्तिनिर्मितीचा यशमार्ग

सहभाग : तृप्ती राणे (सनदी लेखापाल आणि ‘सेबी’ मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार)

कधी : बुधवार, १० मार्च २०२१

वेळ : सायंकाळी ६ वाजता