करोनाच्या प्रादुर्भावात सरलेल्या वर्षांचा ताण काहीसा बाजूला सारून मात्र, आवश्यक ती सर्व काळजी घेऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा ‘लोकसत्ता’च्या ७३व्या वर्धापनदिनी बुधवारी भरला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजकीय फटकेबाजी, दिलखुलास उत्तरे आणि भविष्यवेधी आराखडा मांडणारी मुलाखत यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्टय़ ठरले. सरलेल्या वर्षांतील महत्त्वाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या ‘लोकसत्ता वर्षवेध’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

राजकीय चिमटे, करोनातून सावरण्यासाठीच्या उपाययोजना अशा अनेक विषयांना स्पर्श करत ठाकरे यांची मुलाखत रंगत गेली. मंत्री, राजकीय नेते, प्रशाकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, उद्योग, बँकिंग क्षेत्रातील मान्यवर समारंभाला उपस्थित होते. एक्स्प्रेस टॉवर्सच्या हिरवळीवर प्रसन्न सायंकाळी रंगलेल्या समारंभात सरलेल्या वर्षांतील करोनाच्या संकटाला तोंड देताना निर्माण झालेला ताण हळूहळू ओसरत गेला आणि अनौपचारिक गप्पांचे फड रंगले. वर्षभरातील दुराव्याची कसर या सोहळ्याने भरून काढली. राजकीय आखाडय़ात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेल्या नेत्यांमध्येही गप्पाष्टके रंगलेली दिसत होती.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन, नियमांचे पालन करून हा स्नेहमेळावा झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. उपस्थितांचे आभार ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांनी मानले.

 

मुख्य प्रायोजक : वर्ल्ड वेब सोल्युशन्स

सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,

सिडको, महाराष्ट्र औद्योगिक

विकास महामंडळ, रुणवाल ग्रुप,

पुनीत बालन स्टुडिओज

बँकिंग पार्टनर : टीजेएसबी सहकारी बँक लि.

पॉवर्ड बाय पार्टनर : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट