News Flash

प्रकाशक शिवा घुगे यांचे निधन

प्रभात प्रकाशनचे मालक मुद्रक, प्रकाशक शिवा घुगे यांचे शनिवारी पहाटे केईम रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा

| February 2, 2014 04:05 am

प्रभात प्रकाशनचे मालक मुद्रक, प्रकाशक शिवा घुगे यांचे शनिवारी पहाटे केईम रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे
दै. महानगरमध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून कामास सुरवात केल्यापनंतर त्यांनी नंतर स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु केली आणि अगदी तरुण वयात स्वत:चे मुद्रणालयही सुरु केले. मराठी भाषा आणि साहित्य यांना वाहिलेल्या ‘समकालीन संस्कृती’ या मासिकाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
या मासिकाचे संपादक म्हणून विजय तापस, प्रदीप कर्णिक आदींनी काम पहिले. सुनिल कर्णिक यांचे ‘बिन मौजेच्या गोष्टी, सारंग दर्शने यांनी लिहिलेले अण्णा हजारे यांचे चरित्र, ज्ञानेश महाराव यांचे ’ठाकरे फॅमिली’ पुस्तके तसेच प्रकाश अकोलकर लिखित ‘शिवसेनेचा इतिहास’ अशी वेगळ्या विषयावरील पुस्तके तसेच नामदेव ढसाळ, नितीन तेंडूलकर, विठ्ठल उमप, गणपत पाटील, रामभाऊ कापसे, द्वारकानाथ संझगिरी, अशोक राणे आदी लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2014 4:05 am

Web Title: publisher shiva ghuge passed away
Next Stories
1 लाचखोर अधिकाऱ्यास अटक
2 मुलाचे अपहरण करणाऱ्या चौकडीला अटक
3 पतीच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू
Just Now!
X