कुख्यात रवी पुजारी टोळीच्या एका गुंडाला मुंबई पोलिसांनी चेंबूर येथून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मुंबईतल्या धनाढय़ बिल्डरांची माहिती तो रवी पुजारी टोळीला पुरवत असे.पुजारी टोळीचा एक सदस्य चेंबूर येथील अमरधाम स्मशानाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या पथकाने सापळा लावून प्रधान याला अटक केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. प्रधान व्यवसायाने सुतार असून तो अंबरनाथ येथे राहतो. गेल्या काही महिन्यांपासून तो रवी पुजारी टोळीसाठी काम करीत होता.